Ram Satpute on Ranjitsinh Mohite Patil : आमदार रणजितसिंह मोहिते यांची भाजपमधून हकालपट्टी करा अशी मागणी माळशिसरचे माजी आमदार राम सातपुते यांनी केली आहे. आज त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोहिते पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. मोहिते पाटील यांच्या कारखान्याला 113 कोटी रुपये देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, त्यातील अर्धे पैसा मला पाडण्यासाठी मोहिते पाटलांनी वापरल्याचे सातपुते म्हणाले. 


माझ्या कार्यकर्त्याला जबर मारहाण केली


रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उत्तमराव जानकर यांचा उघड प्रचार केला. माझी पत्नी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेली तिथं ट्रॅक्टर रस्त्यात आडवे लावून यांनी रस्ता आढावल्याचे देखील सातपुते म्हणाले. आमच्या कार्यकर्त्यांचं रक्त सांडलं आहे, त्यामुळे तत्काळ रणजितसिंह मोहिते पाटील यांची हकालपट्टी करा असे राम सातपुते म्हणाले.  यांनी माझ्या कार्यकर्त्याला जबर मारहाण केली आहे. त्यांनी उत्तमराव जानकर यांचा उघड प्रचार केल्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले असल्याचे राम सातपुते म्हणाले. 


माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली.भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले ,संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदिने भाजपविरोधात काम केल. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. त्यामुळे रणजितसिंह  मोहिते पाटील यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी. असा घणाघाती आरोप करत राम सातपुते (Ram Satpute) यांनी विधान परिषदेचे आमदार रणजित मोहिते यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. याबाबत भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी काल एक ट्विट देकील केलं होतं. 


भाजप कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील


भाजपच्या कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर याचे परिणाम गंभीरपणे भोगावे लागतील असा थेट इशारा भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटलांसह विद्यमान आमदार उत्तम जानकर (MLA Uttam Jankar) यांना दिला. राम सातपुते यांनी मोहिते पाटील कुटुंबावरही सडकून टीका केली. ज्यांना सगळे दिले त्यांनी भाजपाला दगा दिला असे सांगत पक्ष याची नक्की दखल घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


महत्वाच्या बातम्या:


माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला जर धक्का लागला तर याद राखा, राम सातपुतेंचा मोहिते पाटलांसह उत्तम जानकरांना इशारा