Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मतदानाविरोधात तसेच ईव्हीएम मशीन, मतदार यादीतील फेरफार केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून हायकोर्टात धाव घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. यात मविआतील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, रमेश बागवे, मनोहर मढवी, नरेश मनेरा यांच्या कडून निवडणुकी विरोधात याचिका दाखल करणार आहे. तर दुसरीकडे राज्यात मुंबईमध्ये 38, औरंगाबादमध्ये 17 तर नागपूरात 12 केसेस दाखल करण्यात आल्या असून आणखी जवळपास शंभर केसेस दाखल होणार असल्याची शक्यता आहे.
विधानसभा निकालावर आणि आयोगाच्या कार्यप्रणाली विरोधात पहिल्यांदाच एवढा मोठ्या संख्येनं कोर्टात याचिका दाखल होणार आहे. दरम्यान, मतदार यादीत खूप मोठा घोळ होऊन त्यामुळे संशयात भर पडल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे. ईव्हीएमचा निवडणुकीत वापर, तसेच धर्माच्या आधारे मत घेण्यात आल्याचेही याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. तसेच पैशाचा वापर करत मतदान करण्यात आल्याचा आणि त्या संदर्भात पुरावेही याचिकेत जोडण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानं ऐनवेळी बदलले निर्णय दबाव पोटी असल्याचाही या याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. निवडणूक पारदर्शक झालेली होती, तर त्यामध्ये सीसीटीव्ही का दिले नाहीत? असा सवालही याचिकेतून विचारण्यात आला आहे.
मविआच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव
दोन दिवसांआधी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह इतर आठ विधानसभा मतदार संघातील निवडणुकीला आव्हान देण्यात आले होते. यात दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत प्रफुल गुडधेसह यशोमती ठाकूर, सुभाष धोटे, गिरीश पांडव, राजेंद्र शिंगणे, शेखर शेंडे, संतोष सिंग रावत यांनी याचिका दाखल केली होती. निवडणुकीत नियमाचे मोठ्याप्रमाणत उल्लघन झाले. तसेच ईव्हीएम छेडखानी झाली, मतदार याद्यात घोळ, व्हीव्हीपैड फेरमोजणीला प्रतिबंध यासह अनेक मुद्दे या याचिकेत मांडण्यात आले. दरम्यान आज याच मुद्याला पुढे नेत मविआच्या आणखी 6 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
काटोलचे पराभूत उमेदवार सालील देशमुख, हिंगण्याचे पराभूत उमेदवार रमेश बंग, जत विधानसभा मतदार संघातील विक्रम सावंत, पिंपळी चिंववडचे राहुल कलाटे, आकोटचे महेश गनगाने आणि बुलढाण्याच्या जयश्री शेळके या आज न्यायालयात आपली याचिका दाखल करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
हे ही वाचा