नवी दिल्ली : विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार या मिलियन डॉलर प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. दिवाळीपूर्वीच राज्यात निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात 21 ऑक्टोबरला मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत याबाबत घोषणा केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान होणार आहे. तर हरियाणाच्या 90 जागांसाठी मतदान होईल. दोन्ही राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदार असून 1.8 लाख ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर निवडणूक प्रक्रिया 2 नोव्हेंबरपर्यंत होणार पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.

विधानसभा निवडणूक कार्यक्रम
* अर्ज भरण्याची तारीख  : 27 सप्टेंबर
* अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर
* अर्ज छाननी : 5 ऑक्टोबर
* अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 7 ऑक्टोबर
* मतदानाची तारीख : 21 ऑक्टोबर
* निकाल : 24 ऑक्टोबर



मतदान आणि निकाल
मतदान - 21 ऑक्टोबर
निकाल- 24 ऑक्टोबर

2014 मधील पक्षीय बलाबल
भाजप - 122 जागा
शिवसेना - 63 जागा
काँग्रेस - 42 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस - 41 जागा
इतर - 20 जागा
एकूण - 288 जागा

2014 मध्ये विभागनिहाय कोणत्या पक्षाला किती जागा?

मुंबई (36) : भाजप 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी काँग्रेस 00, इतर 02

कोकण (39) : भाजप 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 06

पश्चिम महाराष्ट्र (70) : भाजप 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 19, इतर 04

उत्तर महाराष्ट्र (35) : भाजप 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी काँग्रेस 05

विदर्भ (62) : भाजप 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 01, इतर 03

मराठवाडा (46) : भाजप 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 03

इतर : 02

एकूण (288) : भाजप 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41, इतर 20

VIDEO | दिवाळीनंतर निवडणुका घेण्याची काही पक्षांची मागणी, निवडणूक आयोगाची माहिती | ABP Majha