मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला 103 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 50 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. काही उमेदवार हे 400 ते 1500 मतांच्या फरकाने निवडून आले आहेत.

मनसे सोडून शिवसेनेत आलेले माजी नगरसेवक दिलीप लांडे मुंबईतल्या चांदीवली मतदारसंघातून निवडणूक लढले. या मतदारसंघात लांडे यांनी निसटता विजय मिळवला आहे. लांडे यांना 85 हजार 879 इतकी मतं मिळाली आहेत. तर त्यांनी या मतदारसंघात काँग्रेसच्या नसीम खान यांचा पराभव केला आहे. नसीम खान यांना 85 हजार 470 इतमी मतं मिळाली. दिलीप लांडे यांनी अवघ्या 409 मतांनी विजय मिळवला आहे.

पुण्यातल्या दौंड मतदारसंघातही चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या राहुल कुल यांनी 673 मताधिक्याने विजय मिळवला आहे. कुल यांना 1 लाख 3 हजार 664 मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधात लढणाऱ्या काँग्रेसच्या रमेश थोरात यांना 1 लाख 2 हजार 918 मतं मिळाली आहेत.

सांगोल्यातही चुरशीची लढत पाहायला मिळाली. सांगोला मतदारसंघात शिवसेनेच्या शहाजीबापू पाटील यांनी शेकापच्या अनिकेत देशमुख यांचा अवघ्या 768 मताधिक्याने पराभव केला आहे. शहाजीबापूंना 99 हजार 464 मतं मिळाली आहेत. तर अनिकेत देशमुखांना 98 हजार 696 इतकी मतं मिळाली आहेत.

अहमदनगरमधल्या कोपरगाव मतदारसंघात राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांनी अवघ्या 822 मताधिक्याने भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांचा पराभव केला आहे. काळे यांना 87 हजार 566 तर कोल्हे यांना 86 हजार 744 मतं मिळाली आहेत.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड विधानसभेच्या निवडणुकीतही चुरशीची लढत पाहायला मिळाली. बीडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांना बीडमधून उमेदवारी दिली. त्यामुळे बीडमध्ये काका-पुतण्यामध्ये स्पर्धा होती. या स्पर्धेत संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारली. परंतु हा विजय संदीप यांच्यासाठी सोपा नव्हता. अवघ्या 1786 मताधिक्याने त्यांनी विजय मिळाला आहे. संदीप क्षीरसागर यांना 99 हजार 934 मतं मिळाली आहेत. तर जयदत्त क्षीरसागर यांना 97 हजार 950 इतकी मतं मिळाली आहेत.

पाहा निसटत्या विजयाबाबत काय म्हणत आहेत संदीप क्षीरसागर?



बोरीवली मतदारसंघात दहा हजार मतं नोटाला, विनोद तावडेंना काय वाटतं? | ABP Majha



'हे' आहेत सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेले उमेदवार