Maharashtra Assembly Election Karmala constituency: आज राज्यभर विधानसभा निवडणुकीसाठी ( Assembly Election) मतदान प्रक्रिया पार पडत आहे.  मात्र, अनेक ठिकाणी मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच एक करमाळा (Karmala) तालुक्यातील मतदान केंद्रावरील व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. करमाळा मतदारसंघातील (Karmala constituency) मतदान यंत्रावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा फोटो ठेवून मतदान केले आहे. या मतदाराने मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल होत आहे. 


करमाळा विधानसभा मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची मानली जात आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाकडून नारायण पाटील हे निवडणूक लढवत आहेत. तर महायुतीकडून दिग्वीजय बागल हे निवडणूक लढवत आहेत. तर आमदार संजयमामा शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत आहे. ही तिरंगी लढत अत्यंत चुरशीची मानली जात आहे. दरम्यान, प्रत्येक मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अशातच जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून एका मतदाराने तुतारीला मतदान करुन व्हिडीओ व्हायरल केला आहे. या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 


करमाळा विधानसभा मतदारसंघातील लढत रंगतदार


गत निवडणुकीत शिवसेनेतून निवडणूक लढवलेल्या येथील नेत्या रश्मी बागल यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यातच, विधानसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांनी उमेदवारीवर चर्चा केली होती. त्यामुळे, रश्मी बागल यांनाच तिकीट मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. करमाळा विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावी अशी मागणी रश्मी बागल यांनी केली होती. मात्र, त्या बाहेरील असल्याचं म्हणत बागल यांच्या नावाला स्थानिक शिवसेनेचा विरोध पाहायला मिळाला. मात्र, ऐनवेळी दिग्विजय बागल यांचा शिवसेना पक्षप्रवेश करुन त्यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, अजित पवार यांनी याठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा न देता अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून माजी आमदार नारायण पाटील मैदानात उतरले आहेत. त्यामुळं या मतदारसंघातील लढत ही रंगतदार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव