Subhash Deshmukh : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वी त्यागाची भूमिका घेतली होती. त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची अपेक्षा असल्याचे मत माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी व्यक्त केलं. भाजप दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचा लोकमंगल बँकेच्या ( Lokmangal Bank) वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. आमदार सुभाष देशमुख हे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 72 हजार मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत.
मला मंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षा नाही : सुभाष देशमुख
आमदार सुभाष देशमुख हे लोकमंगल बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. दरम्यान देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते असून त्यांनी यापूर्वी त्यागाची भूमिका घेतली होती. मात्र, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. मला मंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षा नाही, पक्ष सांगेल त्याप्रमाणे आम्ही करणारे कार्यकर्ते आहोत. देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. त्यामुळं आम्ही पक्षादेश पाळणारी माणसं आहोत, मंत्रिपद दुय्यम आहे, असंही देशमुख म्हणाले.
कोण होणार महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकालानंतर मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू आहे. भाजपच्या काही नेत्यांनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पुन्हा एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी इच्छा देखील व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार, ही निवडण्याची मोठी जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात पुढे आहे. आज संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या वरीष्ठ नेत्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत भाजपला मिळालेले मोठे यश आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मिळालेल्या यशानंतर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: