Maharashtra Assembly Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या चुरशीच्या आणि अतितटीच्या लढतीनंतर मराठवाडा विभागाकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीत मराठवाड्याचा पहिला कल हाती आला आहे. मतमोजणीच्या पहिल्या कलात महायुती आघाडीवर असल्याचं समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली अशा बहुतांश भागात पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात पोस्टल मतमोजणीत महायुती आघाडीवर असून भाजप आणि शिंदे गटाला आतापर्यंत २४ जागा तर महाविकास आघाडीला ३ जागा असून इतर पक्षांना १ असे आघाडीचं स्वरुप समोर येत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान 20 तारखेला पार पडले होते. त्यानंतर आज आज मतमोजणी होत आहे. प्रथम पोस्टल मतांची मतमोजणी सुरू होत झाली असून अवघ्या काही क्षणात पहिला कल हाती आला आहे.बहुतांश एक्झीट पोल्सनुसार, मराठवाड्यात महाविकास आघाडी अधिक जागा मिळवू शकते असा अंदाज होता. पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या कलानुसार महायुतीची सरशी होताना दिसत आहे. पोस्टल मतांच्या मोजणीचा पहिला कल भाजपच्या बाजूने गेल्याचे समजते. त्यामुळे महायुतीचे खाते उघडले आहे. पोस्टल मतांच्या मोजणीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपने पोस्टल मतमोजणीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता ट्रेंड कायम राहणार का, हे बघावे लागेल. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रांमधील मते मोजण्यास सुरुवात होईल. तेव्हा निकालाचे खरे कल समोर येण्यास सुरुवात होईल. मविआने आतापर्यंत दोन जागांवर आघाडी घेतली आहे. तर महायुतीही दोन जागांवर आघाडीवर आहे.
पोस्टल आघाडीत महायुतीची सरशी
मराठवाड्यात लाडकी बहीण, जरांगे फॅक्टरनंतर महायुतीची ताकद वाढणार की महाविकास आघाडी वरचढ ठरणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. दरम्यान मराठवाड्यातील पोस्टल मतमोजणीत महायुती आघाडीवर दिसत आहे.
नांदेड जिल्ह्यात महायुती आघाडीवर, काँग्रेस अपक्ष किती?
मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुतीची सरशी होताना दिसत आहे. दरम्यान नांदेड जिल्ह्यातील मतमोजणीचे पहिले कल हाती यायला सुरुवात झाली आहे. नांदेड मधील किनवट मध्ये भाजपचे भीमराव केराम आघाडीवर असून भोकरमध्ये भाजपच्या श्रीजया चव्हाण यांचीही सरशी होत आहे. नायगावमध्ये राजेश पवार तर देगलूर मध्ये जितेश अंतापुरकर मुखेड मध्ये तुषार राठोड हे भाजप उमेदवार आघाडीवर आहेत. हदगाव मध्ये काँग्रेसच्या माधव पवारांना आघाडी मिळत असल्याचे दिसतय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या संगीता डक यांना नांदेड उत्तरमधून आघाडी मिळताना दिसत आहे .
धाराशिव,परभणीमध्ये पहिल्या फेरीत कोणाची आघाडी?
धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा विधानसभा मतदारसंघातील ताजे कल हाती आले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंत पहिला फेरीत आघाडीवर असल्याचे दिसते. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आनंद भरोसे ६२९ मतांनी आघाडीवर असल्याचे समोर येत आहे.