Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. मुंबई वगळता कोकण, मराठवाड आणि विदर्भात ठाकरे गटाची धुळदाण झाली आहे. माहीमध्ये ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी राजपुत्र अमित ठाकरे यांचा पराभव केला. तसेच गुवाहाटीला गेलेल्या आमदारांपैकी पाच आमदार पराभूत झाले आहेत. हा निकाल सोडल्यास ठाकरेंच्या हाती फार काही लागलेलं नाही. दरम्यान, ठाकरे यांच्या विजय मिळवलेल्या आमदारांच्या यादीमध्ये हारून (Haroon Khan) खान यांचाही समावेश आहे. शिवसेना तिकिटावर मुस्लिम नेत्याने निवडणूक जिंकण्याची 25 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 1999 मध्ये अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून सब्बीर शेख यांनी अविभाजित शिवसेनेकडून निवडणूक जिंकली होती.


सब्बीर शेख हे बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे होते. मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते कामगार मंत्रीही होते. प्रदीर्घ आजाराने 2014 मध्ये त्यांचे निधन झाले. या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या तिकिटावर एकही मुस्लिम उमेदवार निवडणूक लढला नाही.


हारून खान यांनी भाजपचा पराभव केला


हारून खान यांनी वर्सोवा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या आमदार भारती लवेकर यांचा पराभव केला. हारून खान यांनी भारती लवेकर यांचा पराभव केला. लवेकर यांचा हारून खान यांच्याकडून अवघ्या 1600 मतांच्या फरकाने पराभव झाला. हारून खान यांना 65396 तर भारती लवेकर यांना 63796 मते मिळाली. या जागेवर तिसऱ्या क्रमांकावर असलेले राजू श्रीपाद पेडणेकर यांना 6752 मते मिळाली.






अपक्षांनी किती मते कापली?


हारून खान आणि भारती लवेकर यांच्याशिवाय 14 उमेदवार रिंगणात होते. कुठे ना कुठे या उमेदवारांनी मते कापण्याचे कामही केले. या जागेवर NOTA च्या बाजूने चांगली मतेही पडली आहेत. 1298 लोकांनी NOTA च्या बाजूने मतदान केले होते.


वर्सोव्याचा निवडणूक इतिहास


2009 मध्ये वर्सोवा मतदारसंघातून काँग्रेसचे बलदेव खोसा विजयी झाले होते, तर 2014 आणि 2019 मध्ये भारती लवेकर विजयी झाल्या होत्या. दोन्ही निवडणुकीत भारती लवेकर यांनी बलदेव खोसा यांचा पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत भारती यांना 41,057 मते मिळाली होती. 2024 च्या निवडणुकीत वर्सोवा जागेवर जास्त मतदान झाले पण भारती यांना त्याचा लाभ मिळू शकला नाही.


इतर महत्वाच्या बातम्या