Dharashiv: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर धाराशिव येथील मामा भाच्याची जोडी विधानसभेत पोहोचली आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आमदार झाले आहेत. तर त्यांचे भाचे अभिजित पाटील माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चिन्हावर निवडून आले आहेत. कैलास पाटील दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. तर अभिजीत पाटील पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत.धाराशिव जिल्ह्यातही साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा संपर्क आहे. त्यामुळेच निकालानंतर मामा भाच्याच्या विजयाचे काम दमदार - मामा भाच्चे आमदार असे बॅनर धाराशिव आणि तुळजापूर शहरात पाहायला मिळत आहेत.
काम दमदार मामा भाच्चे आमदार!
उस्मानाबाद मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि माढ्यातून ३० वर्षांची सत्ता उलथवत ऐतिहासिक विजय मिळवलेले शरद पवार गटाचे अभिजित पाटील या मामा भाच्चे आमदारांच्या बॅनरने धाराशिव आणि तुळजापूरमध्ये लक्ष वेधलं आहे. काम दमदार मामा भाच्चे आमदार आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन अशा आशयाची पोस्टर्स सध्या झळकत आहेत.
उस्मानाबादमधून मामा माढ्यातून भाच्चा!
विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघात एकूण १२ उमेदवार रिंगणात होते. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी अटीतटीची लढत उस्मानाबादमध्ये पहायला मिळाली. यात शिंदे गटाच्या अजित पिंगळे यांचा पराभव करत १३ लाख ५७३ मतांनी कैलास पाटील निवडून आले. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या शिवसेना फुटीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत राहिलेले कैलास पाटील यांना पुन्हा संधी दिली होती. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत याच मतदारसंघातून कैलास पाटील यांनी विजय मिळवला होता. माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पाटील हे 30,621 इतक्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांचा व महायुतीच्या उमेदवार मीनल साठे यांचा दणदणीत पराभव केला.
काळजीवाहू सरकारची काही भूमिका आहे का?
सोयाबीन उत्पादन आणि खरेदी याचा मेळ बसत नसल्याचंही निदर्शनास आले आहे. धाराशिव जिल्ह्यात सरकारी माहितीनुसार 78 लाख 59 हजार क्विंटल सोयाबीन उत्पादन झालं आहे. तर सरकारकडून 26 हजार क्विंटल सोयाबीनची आतापर्यंत खरेदी झाली आहे. खरेदी केंद्रांची अपुरी संख्या, ओलाव्याची अट यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने व्यापाऱ्यांना कमी भावात सोयाबीन विकावं लागत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी काळजीवाहू सरकारची काही भूमिका आहे का? असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी केला.
हेही वाचा:
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला