सर्व्हेत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महायुतीला 194 जागा (भाजप 134 + शिवसेना 60) मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाआघाडीला 86 (काँग्रेस 44 + राष्ट्रवादी 42)जागा मिळतील. तर इतर पक्ष आणि अपक्षांना केवळ 8 जागा मिळतील.
दरम्यान 48.8 टक्के लोकांनी भाजपची सत्ता येईल या बाजूने कल दिला आहे. तर शिवसेनेला 9 टक्के , काँग्रेसला 10.6 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला 11.3 टक्के, इतर 11.3 टक्के असा कल या सर्व्हेमध्ये देण्यात आला आहे. तर 8.9 टक्के लोकांनी सांगता येत नाही असं सांगितलं आहे.
सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आलेले महत्त्वाचे अंदाज
यंदा विधानसभेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?
भाजप - 134
शिवसेना - 60
काँग्रेस - 44
राष्ट्रवादी - 42
इतर - 8
कोणाला किती जागा मिळणार? (विभागानुसार)
मुंबई - एकूण जागा 36
महायुती - 32
महाआघाडी - 04
इतर - 00
ठाणे-कोकण - एकूण जागा 39
महायुती - 34
महाआघाडी- 04
इतर - 01
मराठवाडा - एकूण जागा 46
महायुती - 24
महाआघाडी - 20
इतर - 02
उत्तर महाराष्ट्र - एकूण जागा 35
महायुती - 21
महाआघाडी - 13
इतर - 01
विदर्भ - एकूण जागा 62
महायुती - 40
महाआघाडी - 19
इतर - 03
पश्चिम महाराष्ट्र - एकूण जागा 70
महायुती - 43
महाआघाडी - 26
इतर - 01
सर्व्हेमध्ये विचारण्यात आलेले प्रमुख प्रश्न
1. या निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येईल?
भाजप - 48.8 टक्के
शिवसेना - 9 टक्के
काँग्रेस - 10.6 टक्के
राष्ट्रवादी - 11.3 टक्के
इतर - 11.3 टक्के
सांगता येत नाही - 8.9 टक्के
2. तुमच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार होईल?
भाजप - 37.7 टक्के
शिवसेना - 17.7 टक्के
काँग्रेस - 13.4 टक्के
राष्ट्रवादी - 16.1 टक्के
इतर - 6 टक्के
सांगता येत नाही - 9.1 टक्के
3. राज्यातलं सरकार तुम्ही तातडीने बदलू इच्छिता का?
होय - 55 टक्के
नाही - 44.6 टक्के
माहित नाही - 0.4 टक्के
4. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री तातडीने बदलू इच्छिता?
होय - 54.5 टक्के
नाही - 44.7 टक्के
माहित नाही - 0.8 टक्के
5. तुम्हाला तुमचा आमदार तातडीने बदलायचा आहे का?
होय - 54.7 टक्के
नाही - 43.1 टक्के
माहित नाही - 2.2 टक्के
एबीपी माझासाठी सीव्होटर या एजन्सीने हे सर्वेक्षण केलं आहे. या जनमत चाचणीसाठी राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघातील 19489 सँपल्स तपासण्यात आले. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले.
एबीपी माझा सीव्होटर या जनमत चाचणीचे अंदाज दैनंदिन ट्रॅकिंग पोल पद्धतीने गेल्या सात दिवसातील वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या राज्यातील मतदारांशी चर्चा करुन काढले आहेत. सीव्होटरने या जनमत चाचणीसाठी राज्यातल्या सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातील वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांशी चर्चा केली. या जनमत चाचणीच्या अंदाजातील मार्जिन ऑफ एरर मॅक्रो लेवलवर +/- 3% तर मायक्रो लेवलवर +/- 5% आहे.