Jayant Patil Madha Assembly Constituency : महाराष्ट्रात आता परिवर्तनाची लाट आहे. अनेक ठिकाणी नवखे उमेदवार आम्ही दिले आहेत. लोक त्यांना डोक्यावर घेत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राच्या विधानसभेत नवखे चेहरे जातील त्यात अभिजीत पाटील असतील असे जयंत पाटील म्हणाले. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. यावेळी त्यांनी कष्ट भोगले. त्रास सहन केल्याचे अभिजीत पाटील म्हणाले. पाच कारखान्यांचे नेतृत्व ते करत आहे. त्यांचे कर्तृत्व बघून पवारसाहेबांनी त्यांना तिकीट दिल्याचे पाटील म्हणाले. लोकशाही मार्गाने विठ्ठल कारखान्याची निवडणूक त्यांनी जिकंली आहे. तरुण आहेत, जोश आहे असे पाटील म्हणाले. त्यांच्या मागे फार काही परंपरा नाही. एक नवा चेहरा तुमच्यासमोरअसल्याचे जयंत पाटील म्हणाले. बदल करा अभिजीत पाटील यांना विधानसभेत पाठवा असे पाटील म्हणाले. 


हे त्रिकूट सत्तेतून घालवण्यासाठी अभिजीत पाटील यांना निवडून द्या


सिमेंटचे दर वाढले, पेट्रोलचे दर या भाजप सरकारने वाढवले आहेत. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्र गुजरातला आंदण देण्याचं काम या सरकारनं केल्याचे जयंत पाटील म्हणाले. देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचे उत्पन्न हे 15 टक्के असायचे पण या महायुती सरकारच्या काळात हा वाटा 13 टक्क्यांवर गेल्याचे जयंत पाटील म्हणाले. हे त्रिकूट सत्तेतून घालवण्यासाठी अभिजीत पाटील यांना निवडून द्या असेही जयंत पाटील म्हणाले. पहिल्यांदा शिवसेना फोडली, त्यानंतर आमचा पक्ष फोडला असल्याचे जयंत पाटील म्हणाले.


आम्ही सत्तेवर आल्यावर काय करणार? 


आधी अभिजीत पाटील यांना निवडून आणा, त्यानंतर बघू काय करायचं ते जयंत पाटील म्हणाले. आम्ही सत्तेवर येणार आहोत. आण्ही महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे. यामध्ये आम्ही प्रत्येक महिलेला महिना 3000 रुपयांची आर्थिक मतद दिली जाणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. तो बाबा 1500 रुपये देत होता, आम्ही 3000 रुपये देणार आहोत. त्यामुळं हा निरोप सगळीकडे पोहोचवा असेजी जयंत पाटील म्हणाले. तसेच आम्ही शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करणार आहे. तसेच 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला असल्याचे जयंत पाटील म्हणाले. तसेच जणगणना देखील करण्याचा निर्णँय आम्ही घेतला आहे. आरक्षणाच्या संदर्बातील समज गैरसमज दूर करण्याचा यामाध्यमातून आम्ही प्रयत्न करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.