यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. यामध्ये यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी, उमरखेड, पुसद आणि दिग्रस मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्यातील सातपैकी तीन मतदारसंघ राखीव आहेत. यामध्ये राळेगाव आणि आर्णी हे मतदारसंघ राखीव आहेत. उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून भाजपनं किसन वानखेडे यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसनं साहेबराव कांबळेंना उमेदवारी दिली होती.या मतदारसंघात भाजनं सलग तिसऱ्यांदा या विधानसभा मतदारंसघात विजय मिळवला आहे. तर 2009 ला काँग्रेसनं या जागेवर विजय मिळवला होता. किसन वानखेडे यांना 108682 मतं मिळाली. तर, साहेबराव कांबळे यांना 92053 मतं मिळाली आहेत. किसन वानखेडे यांनी साहेबराव कांबळे यांचा 16629 मतांनी पराभव केला.
उमरखेडमध्ये भाजप आणि काँग्रेस आमने सामने
भाजपनं या निवडणुकीत विद्यमान आमदार नामदेव ससाणे यांच्याऐवजी किसन वानखेडे यांना उमेदवारी दिली. काँग्रेसनं देखील या मतदारसंघातून नवीन उमेदवार दिला होता. साहेबराव कांबळे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
लोकसभेला काय घडलं?
उमरखेड विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातील मतदारांना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिला होता. उमरखेड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांना 82435 मतं मिळाली होती. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाबुराव कोहळीकर यांना 75090 मतं मिळाली होती.
उमरखेड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. भाजपच्या नामदेव ससाणे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 87337 मत मिळाली. तर काँग्रेसच्या विजयराव खडसे यांना 78050 मत मिळाली होती. अपक्ष उमेदवार उमाजी विंकारे यांना 18248 मतं मिळाली होती. नामदेव ससाणे यांनी देखील निसटता विजय मिळवला होता.
इतर बातम्या :