Dharmaraj Kadadi : महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत. मी सुद्धा महाविकास आघाडीतून इच्छुक होतो. पण मला ऐनवेळी तिकीट दिलं नसल्याचे वक्तव्य सोलापूर दक्षिण विधानसभा (Solapur South Vidhansabha) मतदारसंघाचे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी (Dharmaraj Kadadi) यांनी केलं. प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी आधीच पाठीशी राहणार असल्याचे सांगितलं होतं, पण त्यांनी जाहीर काल केलं. हे आधीच जाहीर झालं असतं तर कदाचित आणखी चांगले झाले असते आअसेही काडादी म्हणाले.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून ज्या पद्धतीने टीका करण्यात येतेय किंवा आंदोलन होतंय हे बरोबर नाही, अशा पद्धतीने टीका करणं संस्कृतीला धरून नसल्याचे धर्मराज काडादी म्हणाले. आजपर्यंत मी राजकारणापासून दोन हात दूर राहिलो होतो, मात्र भाजपने मागच्या काळात जी परिस्थिती निर्माण केली, कारखान्याच्या संदर्भात जे राजकारण केलं त्यामुळे मला राजकारणात यावं लागलं असंही काडादी म्हणणाले. काडीदी हे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार होते. ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
नेमकं प्रकरण काय?
महाविकास आघाडीमध्ये सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर शहर दक्षिणची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेलेली होती. शिवसेनेनं इथे अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचा या जागेवर दावा होता मात्र, त्यांना ही जागा मिळाली नव्हती. अखेरच्या दिवशी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. या निर्णयानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. मतदान पार पडल्यानंतर शिवसैनिकांनी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. लोकसभेवेळी प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी बूट चाटण्याचे काम केलं, अशी टीका शरद कोळी यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवाल्यांना वेळीच ठेचून काढलं पाहिजे, अशी विनंती करत असल्याचं शरद कोळी म्हणाले.प्रणिती शिंदे तुम्हालाच काय, तुमच्या बापाला देखील आम्ही भीत नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, असं शरद कोळी म्हणाले.
सोलापूर शहर दक्षिणमध्ये तिरंगी लढत?
सोलापूर शहर दक्षिण महायुतीतीत भाजपकडे आहे. भाजपनं या मतदारसंघातून माजी मंत्री सुभाष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर, शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. उद्धव ठाकरे यांनी अमर पाटील यांच्या प्रचारासाठी सभा देखील घेतली होती. तर, धर्मराजा काडादी यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस या जागेसाठी प्रयत्नशील होती.
महत्वाच्या बातम्या: