मुंबई : माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून सदा सरवणकर, ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत आणि मनसेकडून अमित ठाकरे रिंगणात आहेत. आशिष शेलार यांनी अमित ठाकरे यांना समर्थन देण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यामुळं आमदार सदा सरवणकर यांना माघार घ्यावी लागते की काय अशा चर्चा सुरु होत्या, यावर समाधान सरवणकर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की सदा सरवणकर यांनी माहीममध्ये पन्नास वर्ष काम केलं आहे. तीन टर्म नगरसेवक आणि तीन टर्म आमदार आहेत. गोरगरीब जनतेसाठी काम करत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यापासून सामान्य माणूस, शिवसैनिक सदा सरवणकर यांच्या पाठिशी उभा राहिलेला, असं समाधान सरवणकर म्हणाले. अमित ठाकरे यांची स्वत : ची इच्छा असेल तर राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर जावं, सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा असं समाधान सरवणकर म्हणाले. 


सगळीकडून दबाव येत आहेत, प्रयत्न चालू आहेत. शिंदेसाहेब माहीम विधानसभेवरील भगवा उतरवू देणार नाहीत याची खात्री आहे, असं समाधान सरवणकर म्हणाले. शिंदे साहेब आमच्या पाठिशी राहतील, जिथं शिवसेनेची सुरुवात झाली, तिथं स्थानिक आमदार त्यांच्यासोबत गेले, असं समाधान सरवणकर म्हणाले. आम्हाला भावनिक किंवा काही नाही, जनतेचे प्रश्न सोडवले आहेत. 


राजसाहेब नक्कीच मोठे नेते आहेत, ठाकरे कुटुंब आहे. अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. लढाई होणं गरजेची आहे. जनता जो काम करतो त्याला शंभर टक्के निवडून देईल. खुल्या दिलानं लढाई झाली पाहिजे, असं समाधान सरवणकर म्हणाले. सोमवारी फॉर्म भरणार आहोत, एबी फॉर्म मिळालेला आहे, तयारी सुरु आहे, असं समाधान सरवणकर यांनी सांगितलं. 


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. या विश्वासावर शिवसेनेचे कुटुंब एकत्र आहे, त्याला तडा जाणार नाही, असं समाधान सरवणकर म्हणाले. 


अमित ठाकरेंना भाजपनं विधानपरिषद द्यावी : समाधान सरवणकर


जो जमिनीवर काम करणारा माणूस आहे तो जमिनीवर काम करुन रमतो. विधानपरिषदेसारख्या बॅक डोअर एंट्रीला आमदार समाधान सरवणकर तयार नव्हते, यापुढे ही नसतील. या जर काही गोष्टी असतील तर राजसाहेबांचा चिरंजीव आहे त्यामुळं भाजपनं त्यांची इच्छा असेल तर राज्यसभा, विधानपरिषद द्यावी.  राजसाहेबांचे प्रत्येक नेत्यासोबत संबंध आहेत. अमितची स्वत: इच्छा असेल तर त्यानं राज्यसभा किंवा विधानपरिषदेवर जावं, सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा, असं समाधान सरवणकर म्हणाले.  



आशिष शेलार काय म्हणाले?


उद्धव ठाकरे यांना अमित ठाकरे यांच्याबद्दल नातं वाटत नसेल पण महायुतीला अशा नात्यातील आमच्या घरातील पहिलीच निवडणूक लढवणारा अमित ठाकरे असेल तर त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे असं मला वाटतं, आशिष शेलार म्हणाले होते.


इतर बातम्या : 


Sanjay Raut on Amit Thackeray : अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य; माहीममध्ये मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता