Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live Updates : मोठी बातमी! बीडमध्ये घाटनांदूरमध्ये मतदान केंद्रावर तोडफोड, शरद पवार गटाच्या नेत्याला परळीत मारहाण झाल्यानंतर तणावाची स्थिती
Maharashtra Assembly Election Voting Live Updates : आज होणाऱ्या मतदानाच्या प्रमुख घडामोडी तसेच इतर प्रमुख बातम्यांचा ताजा आढावा वाचा एका क्लिकवर....
माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी घाटनांदुर या ठिकाणी मतदान केंद्रावर तोडफोड
राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले. घटनांदूर मधील मतदान केंद्रा मध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्र फोडण्याची घटना घडली आहे काही काळ यामुळे या ठिकाणचे मतदान थांबवण्यात आले आहे.
सांगली - 8 विधानसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी ( 1 वाजे पर्यंत )
सांगली जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 33.50 टक्के मतदान
मिरज - 30.83 %
सांगली - 32.23 %
इस्लामपूर - 39.02 %
शिराळा - 37.82 %
पलूस - कडेगाव - 31.59 %
खानापूर - 31.59 %
तासगाव कवठेमहांकाळ - 33.51 %
जत - 30.78 %
सोलापूर ब्रेकिंग :
दुपारी 1 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी
- सोलापूर शहर मध्य - 28.61%
- करमाळा विधानसभा -27.34%
- माढा विधानसभा - 26.31%
- बार्शी विधानसभा - 32.71 %
- मोहोळ विधानसभा - 30.51%
- सोलापूर शहर उत्तर विधानसभा - 29.50%
- अक्कलकोट विधानसभा - 33.88%
- सोलापूर शहर दक्षिण - 29.53%
- पंढरपूर विधानसभा - 24.26%
- सांगोला विधानसभा - 31.58%
- माळशिरस विधानसभा - 30.50%
सरासरी : 29.44 % मतदान
राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात
गडचिरोलीत ५०.८९ टक्के मतदान
सर्वात कमी मतदान मुंबई शहरात
मुंबई शहरात फक्त २७.७३ टक्के मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान
मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:
अहमदनगर - ३२.९० टक्के,
अकोला - २९.८७ टक्के,
अमरावती - ३१.३२ टक्के,
औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
बीड - ३२.५८ टक्के,
भंडारा- ३५.०६ टक्के,
बुलढाणा- ३२.९१ टक्के,
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे - ३४.०५ टक्के,
गडचिरोली-५०.८९ टक्के,
गोंदिया - ४०.४६ टक्के,
हिंगोली -३५.९७ टक्के,
जळगाव - २७.८८ टक्के,
जालना- ३६.४२ टक्के,
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर _ ३३.२७ टक्के,
मुंबई शहर- २७.७३ टक्के,
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर - ३१.६५ टक्के,
नांदेड - २८.१५ टक्के,
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक - ३२.३० टक्के,
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
पालघर-३३.४० टक्के,
परभणी-३३.१२टक्के,
पुणे - २९.०३ टक्के,
रायगड - ३४.८४ टक्के,
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली - ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के,
सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,
सोलापूर - २९.४४,
ठाणे -२८.३५ टक्के,
वर्धा - ३४.५५ टक्के,
वाशिम - २९.३१ टक्के,
यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.
मतदानाची 2 तासाची टक्केवारी
जिल्हा पालघर
वेळ 11 ते 1
जिल्ह्याची सरासरी टक्केवारी :33.40%
मतदारसंघ टक्केवारी
1) 128- डहाणू :40.02 %
2) 129-विक्रमगड : 32.1%
3) 130-पालघर : 34.22%
4) 131-बोईसर : 32.5%
5) 132-नालासोपारा : 30.35%
6) 133-वसई : 34.53%
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०१.०० वाजेपर्यंत अंदाजे २७.७३ टक्के मतदान झाले आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील दुपारी ०१.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-
विधानसभा मतदारसंघ मतदानाची टक्केवारी (अंदाजे)
१७८-धारावी - २४.६५ टक्के
१७९-सायन-कोळीवाडा - १९.४९ टक्के
१८०- वडाळा – ३१.३२ टक्के
१८१- माहिम – ३३.०१ टक्के
१८२-वरळी – २६.९६ टक्के
१८३-शिवडी – ३०.०५ टक्के
१८४-भायखळा – २९.४९ टक्के
१८५- मलबार हिल – ३३.२४ टक्के
१८६- मुंबादेवी - २७.०१ टक्के
१८७- कुलाबा - २४.१६ टक्के
नागपूर जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 31.65% मतदान
नांदेड जिल्ह्यात 1 वाजे पर्यंत 28.15 % मतदान झाले
सर्वाधिक मतदान किनवट मतदारसंघात 33.47 % मतदान
छत्रपती संभाजीनगर
सकाळी : 1 वाजेपर्यंत
जिल्ह्याची एकूण टक्केवारी : 33.89 टक्के
सर्वाधिक सिल्लोड 43.85 टक्के मतदान
औरंगाबाद मध्य मतदारसंघ : 29.85
औरंगाबाद पूर्व मतदारसंघ : 33.48
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ : 28.51
गंगापूर विधानसभा मतदारसंघात : 28.99
कन्नड विधानसभा मतदारसंघ : 35.71
पैठण विधानसभा मतदारसंघ : 40.35
फुलंब्री विधानसभा मतदारसंघ : 34.89
सिल्लोड विधानसभा मतदारसंघ : 43.85
वैजापूर विधानसभा मतदारसंघ : 30.72
पालघर जिल्ह्याची सरासरी टक्केवारी :33.40%*
मतदारसंघ टक्केवारी
1) 128- डहाणू :40.02 %
2) 129-विक्रमगड : 32.1%
3) 130-पालघर : 34.22%
4) 131-बोईसर :32.5%
5) 132-नालासोपारा : 30.35%
6) 133-वसई : 34.53%
पालघर जिल्ह्याची सरासरी टक्केवारी :33.40%*
मतदारसंघ टक्केवारी
1) 128- डहाणू :40.02 %
2) 129-विक्रमगड : 32.1%
3) 130-पालघर : 34.22%
4) 131-बोईसर :32.5%
5) 132-नालासोपारा : 30.35%
6) 133-वसई : 34.53%
सातारा जिल्ह्यातील दुपारी 1 पर्यंतची सविस्तर टक्केवारी
फलटण मतदारसंघ - 33.81%
वाई मतदारसंघ - 34.42%
कोरेगाव मतदारसंघ - 38.29%
माण मतादारसंघ - 29.69%
कराड उत्तर मतदारसंघ -35.47%
कराड दक्षिण मतदारसंघ- 36.58%
पाटण मतदारसंघ - 34.97%
सातारा विधानसभा -35.76%
जिल्हा रत्नागिरी वेळ ७ ते १
जिल्ह्याची टक्केवारी - ३८.५२%
मतदार संघ टक्केवारी
१) २६३ दापोली - ३७.०१%
२) २६४ गुहागर - ४०.४५%
३) २६५ चिपळूण- ४०.७७%
४) २६६ रत्नागिरी - ३४.२%
५) २६७ राजापूर- ४०.९८%
महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केदार दिघे यांच्याविरोधात मतदारसंघात दारू आणि पैसे वाटप केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल
केदार दिघे यांच्या गाडीतून दारू आणि पैसे वाटप केल्याचा दिघे यांच्यावर आरोप
केदार दिघे यांच्या गाडीतून दारू आणि पैसे वाटप करत असतांना केदार दिघे स्वतः होते गाडीत उपस्थित
वाटप करत असताना शिंदेंच्या शिवसैनिकांनी रंगेहात पकडले
शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी वर्षा भोसले यांच्या तक्रारीवरून कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून केदार दिघे निवडणुकीच्या रिंगणात
भोसरीतील 7 हजार 500 मतदारांची नावं गायब? एका आठवड्यात 'हे' सत्ताधारीचं करू शकतात. मतदारांचा संताप
भोसरी विधानसभेतील साडे सात हजार मतदारांची नावं अचानकपणे गायब झालीत. आठवड्याभारपूर्वी मतदार यादीत असणारी नावं डिलीट झाल्याचं अन हडपसर, बारामती अशा विविध विधानसभेत नावं टाकल्याचा, दावा मतदारांनी केलाय. यामागे सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत असल्याचा आरोप ही करण्यात आलाय. ही साडे हजार मतं एखाद्या उमेदवाराला विजयी करू शकतात. हे पाहता घडल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
नांदगांव विधानसभा मतदारसंघातील राडा नंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याची निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती
दोन्ही उमेदवारांची समजूत घालण्यात आली आहे
याप्रकरणी आचारसंहिता भंग चे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
सोलापूर ब्रेकिंग
---
नरसय्या आडम यांच्या नावाने खोटे पत्र वायरल केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल
सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघाचे माकप उमेदवार नरसय्या आडम यांच्या नावाने बनावट पत्र वायरल करण्यात आले होते
नरसय्या आडम यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे पत्र झाले होते वायरल
ज्या वॉट्सअप ग्रुपवर पत्र वायरल झाले त्या वॉट्स अप ग्रुप ऍडमिन आणि पोस्ट शेअर करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद
लोकप्रतिनिधीत्व कलम 123(4), भारतीय न्याय संहिता 3(5) नुसार गुन्हा दाखल
पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची माहिती
पैठण तालुक्यातील पाचलगावमध्ये मतदारयादीत जिवंत माणसांना दाखवलं मृत.
गावातील 88 लोकांना दाखवलं मृत
सर्वांनी केलं होतं लोकसभेला मतदान
मात्र विधानसभेच्या मतदार यादीत त्यांच्या नावासमोर डिलीटचा शिक्का
त्यामुळे 88 लोक जिवंत असूनही मतदानापासून वंचित राहणार
याच गावात मृत झालेल्या व्यक्तींची नावे मात्र डिलीटच्या यादीत नाहीत.
सांगली - 8 विधानसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी ( 11 वाजे पर्यंत 18.55 टक्के मतदान )
तालुकानिहाय आकडेवारी
मिरज - 17.9 %
सांगली - 19.6 %
इस्लामपूर - 22.20 %
शिराळा - 20.49 %
पलूस - कडेगाव - 17.34 %
खानापूर - 16.25 %
तासगाव कवठेमहांकाळ - 18.67 %
जत - 16.52 %
कोल्हापूर ब्रेकिंग
फुलाची शिरोली इथं भगव्या टोप्यांवरून तणाव
मतदान करण्यासाठी मतदारांनी भगवी टोपी घातल्याने पोलिसांनी हटकलं
भगव्या टोपीला विरोध केल्याने कार्यकर्त्यांनी गोल टोपी आणि हिजब घालून येणाऱ्या मतदारांना विरोध करण्याची केली मागणी
शिरोली इथल्या मतदान केंद्रावर मतदारांनी मोठ्या प्रमाणात भगव्या टोप्या घालून केला प्रशासनाचा निषेध
कोणत्याही परिस्थितीत भगवी टोपी घालूनच मतदान करण्याचा मतदारांनी घेतला पवित्रा
सातारा जिल्ह्यातील 11 पर्यंतची सविस्तर टक्केवारी
फलटण मतदारसंघ - 17.98%
वाई मतदारसंघ - 18.55%
कोरेगाव मतदारसंघ - 21.24%
माण मतादारसंघ - 15.21%
कराड उत्तर मतदारसंघ - 18.57%
कराड दक्षिण मतदारसंघ- 19.71%
पाटण मतदारसंघ - 18.93%
सातारा विधानसभा - 19.97%
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे...
अहमदनगर - १८.२४ टक्के,अकोला - १६.३५ टक्के,अमरावती - १७.४५ टक्के, औरंगाबाद- १८.९८ टक्के, बीड - १७.४१ टक्के, भंडारा- १९.४४ टक्के, बुलढाणा- १९.२३ टक्के, चंद्रपूर- २१.५० टक्के,धुळे - २०.११ टक्के, गडचिरोली-३० टक्के, गोंदिया - २३.३२ टक्के, हिंगोली -१९.२० टक्के, जळगाव - १५.६२ टक्के, जालना- २१.२९ टक्के, कोल्हापूर- २०.५९ टक्के,लातूर १८.५५ टक्के, मुंबई शहर- १५.७८ टक्के, मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,नागपूर - १८.९० टक्के,नांदेड - १३.६७ टक्के, नंदुरबार- २१.६० टक्के,नाशिक - १८.७१ टक्के, उस्मानाबाद- १७.०७ टक्के, पालघर-१९ .४० टक्के, परभणी-१८.४९ टक्के,पुणे - १५.६४ टक्के,रायगड - २०.४० टक्के, रत्नागिरी-२२.९३ टक्के,सांगली - १८.५५ टक्के,सातारा -१८.७२ टक्के, सिंधुदुर्ग - २०.९१ टक्के,सोलापूर - १५.६४,ठाणे१६.६३ टक्के,वर्धा - १८.८६ टक्के,वाशिम - १६.२२ टक्के,यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.
पुणे जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत २१ विधानसभा मतदारसंघात १५.६४ टक्के मतदान. सर्वात कमी मतदान हडपसर आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात ११. ४६ टक्के तर सर्वाधीक १८.८१ टक्के मतदान बारामतीत .
ब्रेकिंग
मुंबई शहरात सर्वाधिक मतदान मलबार हिल मतदार संघात
सकाळी ११ वाजेपर्यंत मलबार हिल मतदारसंघात १९.७७ टक्के मतदान
सर्वात कमी मतदान सायन कोळीवाडा मतदारसंघात १२.८२ टक्के मतदान
मुंबई उपनगरात भांडुप पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे २३.४२ टक्के मतदान
वांद्रे पूर्व येथे मुंबई उपनगरातील सर्वात कमी मतदान
वांद्रे पूर्व मतदारसंघात १३.९८ टक्के मतदानाची टक्केवारी
सोलापूर ब्रेकिंग :
सकाळी 11 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी
- सोलापूर शहर मध्य - 16.30%
- करमाळा विधानसभा - 13. 28%
- माढा विधानसभा - 11.12%
- बार्शी विधानसभा - 17.51 %
- मोहोळ विधानसभा - 17.22%
- सोलापूर शहर उत्तर विधानसभा - 14.53%
- अक्कलकोट विधानसभा - 18.82 %
- सोलापूर शहर दक्षिण - 16.99%
- पंढरपूर विधानसभा - 12.22
- सांगोला विधानसभा - 17.51 %
- माळशिरस विधानसभा - 16.60%
सरासरी : 15.66 % मतदान
मुंबई शहर जिल्ह्यात सकाळी ७ ते ११ दरम्यान १५.७८ टक्के मतदान
मुंबई उपनगर मध्ये सकाळी ७ ते ११ दरम्यान १७.९९ टक्के मतदान
नंदुरबार
सकाळी - 11 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी
01- अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ- 19.57 टक्के
02- शहादा विधानसभा मतदारसंघ- 24.98 टक्के
03- नंदुरबार विधानसभा मतदारसंघ- 17.57 टक्के
04- नवापूर विधानसभा मतदारसंघ- 24.58 टक्के
जिल्ह्यात एकूण 21.60 टक्के मतदान
चंद्रपूर : सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 21.66 टक्के मतदान
हिंगोली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत सरासरी १९.२० टक्के मतदान
सिंधुदुर्गजिल्ह्यात सरासरी २३ टक्के मतदान
रायगड मतदान टक्केवारी
रायगड जिल्हयातील एकूण सात विधानसभा क्षेत्रातील सकाळी 7 ते 11 वाजे पर्यंतची टक्केवारी
कर्जत मतदार संघ- 20.1 टक्के
महाड मतदार संघ - 22.67 टक्के
पेण मतदार संघ - 18.09 टक्के
अलिबाग मतदार संघ - 19.45 टक्के
पनवेल मतदार संघ - 16.89 टक्के
उरण मतदार संघ- 29.26 टक्के
श्रीवर्धन मतदार संघ - 18.22 टक्के
कोल्हापूर जिल्हा टक्केवारी
सकाळी 11 पर्यंत आकडेवारी
चंदगड - 22.01%
हातकणंगले- 14.25%
इचलकरंजी- 19.77%
करवीर- 26.13%
कोल्हापूर उत्तर- 20.75%
कोल्हापूर दक्षिण - 17.57%
राधानगरी भुदरगड - 23.00 %
शाहूवाडी- 17.52%
शिरोळ- 21.43 %
कागल- 23.68%
एकूण 20.59% मतदान
परभणी जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत 18.49% मतदान
जिंतूर विधानसभा 17.12%
परभणी विधानसभा 19.62%
गंगाखेड विधानसभा 16.85%
पाथरी विधानसभा 20.61%
जिल्हा रत्नागिरी वेळ ७ ते ११
जिल्ह्याची टक्केवारी - २०.५२%
मतदार संघ टक्केवारी
१) २६३ दापोली - १८.३२ %
२) २६४ गुहागर - १७.०५%
३) २६५ चिपळूण- २४.५७%
४) २६६ रत्नागिरी - १८.६०%
५) २६७ राजापूर- २४.०७%
अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज गोरेगाव येथील सेंट झेव्हीयरस शाळेत जाऊन सहकुटुंब आपला मतदानाचा अधिकार बजावला.
नवी मुंबई
ऐरोली विधानसभेत सकाळी नऊ वाजेपर्यंत 6.98 टक्के मतदान
बेलापूर विधानसभेत 7.32 टक्के मतदान
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सहकुटुंब मतदान
डोंबिवलीत चव्हाण कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क
रविंद्र चव्हाण यांच्यासोबत पत्नी आणि दोन्ही मुलींनी केले मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान
*
मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून
९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर - ५.९१ टक्के,अकोला - ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, जळगाव - ५.८५ टक्के, जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के,नागपूर -६.८६ टक्के,नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के,नाशिक - ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे - ५.५३ टक्के,रायगड - ७.५५ टक्के, रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली - ६.१४ टक्के,सातारा - ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग - ८.६१ टक्के,सोलापूर - ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा - ५.९३ टक्के,वाशिम - ५.३३ टक्के,यवतमाळ - ७.१७ टक्के मतदान झाले आहे.
पुणे 2 तासात जिल्ह्यात 05.53 टक्के
मतदारसंघनिहाय टक्केवारी
1)पिंपरी- 04.04
2)चिंचवड- 06.80
3)भोसरी- 06.21
4)वडगाव शेरी- 06.37
5)शिवाजी नगर- 05.29
6)कोथरूड- 06.50
7) खडकवासला- 05.44
8) पर्वती- 06.30
9) हडपसर- 04.45
10) कंटेन्मेंट- 05.53
11) कसबा- 07.44
12) मावळ- 06.07
नागपूर
मतदानाची टक्केवारी,
सकाळी 7 ते 9 -
सुमारे 6.86%
- हिंगणा - 5.32 %
- कामठी - 6.71
- काटोल - 5.20
- मध्य - 6.14
- पूर्व - 8.01
- उत्तर - 3.54
- दक्षिण - 8.40
- दक्षिण -पश्चिम - 8.92
- पश्चिम - 7.50
- रामटेक - 6.71
- सावनेर - 7.25
- उमरेड - 8.98
ठाणे जिल्ह्यात मतदारांचा उत्साह
सकाळी 7 ते 9.00 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण 6.66 टक्के मतदान
मुंबई उपनगरात मुलुंडमध्ये सर्वाधिक मतदान
मुलुंड विधानसभेत पहिल्या दोन तासांत १०.७१ टक्के मतदान
वांद्रे पूर्व याठिकाणी सर्वात कमी म्हणजे ५.०४ टक्के मतदान
राज्यात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात
राज्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान
मनसेचे काही पदाधिकारी आग्रीपाडा पोलीस स्टेशनला पोहचले आहेत
शिवसेना उमेदवाराला राज ठाकरेंचा पाठिंबा असल्याचं पत्र व्हायरल झाल्याने मनेस पदाधिकारी पोलीस ठाण्यात
संदिप देशपांडे आग्रीपाडा पोलीस ठाण्यात दाखल
मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात संत कबीर प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात evm मध्ये तांत्रिक बिघाड आल्याने मतदान थांबलं होते..
आता मशीन दुरुस्त झाल्यानंतर मतदान प्रक्रिया तासभर उशिराने सुरू झाली आहे....
उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात कस्तुरबा नगर परिसरात विनयालय शाळेमधील मतदान केंद्रावर सकाळीच ईव्हीएम बंद पडली आहे...
18 मतदारांचा मतदान झाल्यानंतर ईव्हीएम बंद पडली
सध्या काही मतदार त्या ठिकाणी ईव्हीएम दुरुस्त होऊन मतदान प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहत थांबले आहेत...
ईव्हीएम बंद पडल्यानंतर ही अद्याप मतदान प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे काही मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राहत्यामधील धक्कादायक प्रकार
राधाकृष्ण विखे पाटलांच्या कॉलेजला बाहेरून शिकायला आलेल्या मुलांचे मतदान?
काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे ताईंनी या विद्यार्थ्यांना विचारला जाब
विद्यार्थ्यांना मराठी भाषा येईना.
अहिल्याबाई होळकर मतदान केंद्र लोणी येथील प्रकार
नांदगाव मतदारसंघातील 164 नंबरच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन दोन तासांपासून बंद
एकूण दोन वेळा मशीन बंद पडलेली आहे.
सचिन तेंडुलकरचे मतदारांना आवाहन
महाराष्ट्रातलं आताचं सरकार हे जनतेच्या विरोधात आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे. हे गद्दारांचं, पक्ष फोडणाऱ्यांचं, ईडीचं सरकार आहे. जनतेच्या मनात याबाबत प्रचंड रोष आहे. भाजपाचे मोठे नेत काल पैसे देताना पकडण्यात आले, यापेक्षा मोठं दुर्दैव कोणतं आहे, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
काँग्रेस मुंबई अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे
धारावीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्योती गायकवाड यांनी ही मतदानाचा हक्क बजाविला
यावेळी वर्षा गायकवाड यांच्या आई या ही उपस्थित
सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क
सचिन तेंडुलकरकडून मतदान करण्याचे आवाहन
मतदान करा. ही आपली जबाबदारी आहे. घरातून बाहेर या. मतदान केंद्रांवर चांगले नियोजन करण्यात आलेले आहे.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार देवयानी फरांदे यांनी देवदर्शन घेऊन आजच्या दिवसाची केली सुरुवात....मतदार मला कौल देतील देवयानी फरांदे यांनी केला विश्वास केला
सलग सात वेळा आमदार झालेले दिलीप वळसे पाटील आठव्यांदा आंबेगावच्या निवडणुकीला सामोरे जातायेत. पत्नी आणि लेकिन औक्षण केल्यावर ते मतदानासाठी निघालेत. मात्र यावेळी थेट शरद पवारांनी गद्दारीचा शिक्का मारत थेट आमच्यात कौटुंबिक संबंध नव्हेत, असं सूचित केलं. पण शरद पवारांनी सभा घेतल्याची कोणतीही धास्ती नव्हती, विजय माझाचं होईल असा विश्वास वळसेंनी व्यक्त केलाय. त्यांच्याशी बातचीत केलीये नाजिम मुल्ला यांनी.
सुरेश धस यांनी जामगाव येथे सपत्नीक केले मतदान
आष्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी त्यांच्या मूळ गावी जामगाव या ठिकाणी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला..
बीड जिल्ह्यातील आष्टी या एकमेव मतदार संघात महायुतीतील दोन पक्षात मैत्रीपूर्ण लढत होत आहे या ठिकाणी भाजपकडून सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे हे निवडणूक लढवत आहेत
पालघर मधील सहा मतदारसंघात आज 22 लाख 92 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून या साठी 2278 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत.मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी म्हणून 12500 अधिकारी आणि कर्मचारी तर 4000 पोलीस कर्मचारी 2000 होमगार्ड आणि आठ सी आरपी एफ च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे.मतदान यंत्रणा सज्ज आहे. तर मतदारांनी पहाटेपासूनच मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावायला सुरुवात केली आहे.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर समीर आणि शेफाली भुजबळ यांनी एबीपी माझाची संवाद साधला येवला आणि नांदगाव या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये अनुक्रमे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ विजय होतील असा विश्वास दोघांनी व्यक्त केला विकासाच्या मुद्द्यावर येवल्यामधन आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि भयमुक्त नांदगाव साठी नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत आहोत आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला लाभला असल्याचा दावा समीर भुजबळ यांनी व्यक्त केला समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करत आहेत तर त्यांचा मतदान येवला विधानसभा मतदारसंघात आहे
पुणे
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी बजावला मतदानाचा हक्क
त्यांच्या मूळ गावी जाऊन हातनोशी येथे जाऊन बजावला मतदानाचा हक्क
गेल्या ३ टर्म पासून संग्राम थोपटे भोर चे आमदार
छत्रपती संभाजीनगर ब्रेकींग
पैठण विधानसभा मतदारसंघात खेरडा गावात बचत गटाला पैसे देवून मतदान करण्याचे आवाहन केलं जात असल्याचा आरोप
बचत गटाच्या महिलांना पैसे देतानाचा व्हिडीओ व्हायरल
एका विशिष्ट पक्षाला मतदान करण्यासाठी पैसे वाटप होत असल्याचा आरोप
बारामतीमध्ये मतदानकेंद्र सज्ज
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे. मुंबईतील हाय प्रोफाईल परिसर समजणाऱ्या मलबार ही परिसरामध्येही मतदानाची जय्यत तयारी झालेली आहे. ईव्हीएम मशीन चेक करून मतदानासाठी मतदान केंद्र ही सज्ज झालेली आहेत. मलबार हिल परिसरातील वाॅस सिंघम स्कूलमध्ये मतदानाची तयारी झालेली आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण थोड्याच वेळात मतदान करण्यासाठी राजभवन येथील मतदान केंद्रांवर दाखल होतील.
आज सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. राज्यातील 9.7 कोटी मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी राज्यातील 1 लाख 427 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. त्यापैकी मुंबईत एकूण 2538 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Voting) आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. संपूर्ण राज्यात एकूण 288 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मतदानकेंद्रे उभारण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाच्या (Vidhan Saha Election Voting Today) प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. बारामतीत अजित पवार जिंकणार की नवखे युगेंद्र पवार बाजी मारणार, याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान
राज्यात मतदानासाठी निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाली 9 वाजेपर्यंत राज्यात 6.61 टक्के मतदान झाले आहे. नागपूरसारख्या भागात काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्यामुळे मतदानाचीही प्रक्रिया खोळबल्याचे समोर आले आहे.
राज्यात 'या' मतदारसंघांकडे सर्वांचेच लक्ष
आज संपूर्ण राज्यात मतदान होत असले तरी काही मोजक्या जागांची सध्या राज्यभरात चर्चा आहे. माहीम, कोपर पाचपाखाडी, वरळी, परळी, कोल्हापूर उत्तर यासारख्या मतदारसंघांत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मतदानाची नेमकी वेळ काय?
आज सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. राज्यातील 9.7 कोटी मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी राज्यातील 1 लाख 427 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. त्यापैकी मुंबईत एकूण 2538 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.
Maharashtra Regionwise Seats : प्रदेशनिहाय जागा खालीलप्रमाणे,
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -