Manoj Jarange: विधानसभा निवडणुकांमध्ये जरांगे फॅक्टरविषयी चर्चा असतानाच आता मी थोड्याच दिवसाचा पाहूणा असल्याचं सांगणाऱ्या मनोज जरांगेंनी मतदानाबाबत मराठा समाजाला नेमकं कोणाच्या बाजूनं मतदान करायचं हे सांगितलंय. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. तुम्ही मालक आहात. मी समाजाला कोणाच्याही दावणीला बांधलं नाही. असं ते म्हणालेत.दरम्यान मतदानाच्या दिवशी नेमकं कोणाला मतदान करायचं सांगत मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना महत्त्वाचा मेसेज दिलाय.
सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायला पाहिजे म्हणत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. तुम्ही मालक आहात. मी समाजाला कोणाच्याही दावणीला बांधलं नाही. तुमच्या मनानं तुम्हाला जे करायचे ते करा असं म्हणत आपल्या लेकराच्या बाजूनं आरक्षणाच्या बाजूनं मतदान करण्याचं आवाहन केलंय.
काय म्हणाले मनोज जरांगे?
विधानसभा निवडणुकांसाठी आज राज्यातील २८८ मतदारसंघात मतदान होत आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांचा मराठवाड्यातील मतदारसंघात किती प्रभाव दिसेल याची मोठी चर्चा असताना मनोज जरांगें मतदान नेमकं कोणाला करायचं याबाबत म्हणाले, योग्य माणूस निवडण्याची हीच संधी असेल. आपल्या लेकराच्या बाजूने आरक्षणाच्या बाजूने मतदान करा.मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. तुमच्या मनाने तुम्हाला जे करायचे ते करा. मालक तुम्ही आहेत. असे जरांगे म्हणाले.
माझा पाठिंबा कोणालाच नाही
मी कोणाजवळ फोटो काढला म्हणून मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही असंही मनोज जरांगे म्हणालेत. मी कुठे टीम पाठवली नाही कुठे मेसेज किंवा संदेश पाठवला नाही. मी समाजाला कोणाच्याही दावणीला बांधले नाही असं सांगत मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना मतदान करायला सांगितलं.
कालिचरण महाराज राजकीय दलाल
मराठा आरक्षणाच्या आंदोलनानं हिंदू समाजात फूट पाडल्याचा वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केल्याचं दिसल्यानंतर आता पुन्हा त्यांनी कालिचरण महाराजांवर हल्लाबोल केल्याचं दिसलं. कालिचरण महाराजांच्या टीकेला प्रत्यूत्तर देताना जरांगे म्हणाले, 'राजकीय दलाल आहे त्याला हिंदूंची गरज नाही हिंदूंच्या फोटोची गरज नाही..डबल बोला म्हणजे शंभर टक्के तो राजकीय नेत्यांच्या पाय चाटतो. त्यांना पैसे घेतले आहेत वाटतं त्याच्यावर पण आले आहे म्हणून बोलत आहे त्याला हिंदू धर्माशी देणे घेणे नाही. असं जरांगे म्हणाले.
हेही वाचा: