Ramesh Thorat : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. रमेश थोरात हे खासदार सुप्रिया सुळेच्या (Supriya Sule) भेटीसाठी बारामतीत दाखल झाले आहेत. बारामतीतील शरद पवार यांच्या गोविंदाबाग या निवासस्थानी बैठक होणार आहे. त्यामुळं थोरात हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मी निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे. तुतारीकडून निवडणूक लढवावी, असा लोकांचा आग्रह आहे. नाही मिळाली तर अपक्ष लढा असे कार्यकर्त्यांनी सांगितल्याची माहिती थोरात यांनी दिली आहे. त्याप्रमाणे आम्ही तुतारी हाती घेण्याचे ठरवल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे. आता उद्यापर्यत निर्णय अपेक्षित आहे. रमेश थोरात हे सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी आले आहेत.
मी सध्या तुतारीच्या चिन्हाची वाट बघतोय
गेल्या महिनाभरापासून मी तालुक्यात दौरा केलेला आहे. या दौऱ्यात लोकांचा मोठा पाठिंबा मला मिळाल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे. मतदारसंघात फिरत असताना लोकांनी मला सांगितले की तुतारी मिळाली तर घ्या, नाही मिळाली तर अपक्ष राहावं. कोणत्याही परिस्थितीत परिस्थितीत निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे थोरात म्हणाले. मी सध्या तुतारीच्या चिन्हाची वाट बघत असल्याचे थोरात म्हणाले. ज्या कोणाकडे निवडून येण्याची शक्यता आहे, त्याला तिकीट मिळेल असे सुप्रिया आणि शरद पवार साहेबांनी सांगितल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली.
मेरीट पाहून तिकीट देऊ असं वरीष्ठांनी सांगितलं
मतदारांनी सांगितल्याप्रमाणे मला निर्णय करणं गरजेचं होतं हे मी अजित पवार यांना सांगितल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे. मतदारांच्या म्हणण्याप्रमाणे मला वागावं लागेल नाहीतर मतदार मला बाजूला सारतील असे थोरात म्हणाले. मेरीट पाहून तिकीट देऊ असे सुप्रिया ताईंनी सांगिल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली. 40 वर्षापासून मी राजकारण काम करत आहे. मोठ्या प्रमाणात जनता माझ्यासोबत असल्याची माहिती थोरात यांनी दिली. मी गट तट, जात पात अजिबात बघत नाही. जो येईल त्याच काम मी केलं असल्याची माहिती रमेश थोरात यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: