Rohit Pawar vs Ram Shinde Karjat Jamkhed Assembly constituency 2024 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्यामध्ये मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत चुरस रंगली होती. शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अवघ्या 1 हजार 255 मतांनी विजय मिळवला. परंतु भाजपचे राम शिंदे यांनी फेरमोजणीची मागणी केली. त्यामुळे निकालाची घोषणा लांबणीवर पडली आहे. सुरूवातीपासून मजमोजणीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोचत होती. कारण राम शिंदे कधी पुढे असायचे, तर रोहित पवार (Rohit Pawar) पुढे असायचे. शेवटी राम शिंदेंकडून रोहित पवारांनी विजय खेचून आणतील.
कर्जत-जामखेड मतदारसंघात 26 फेऱ्या झाल्या. शेवटच्या फेरीत रोहित पवार 391 मतांची आघाडी होती. परंतु राम शिंदे यांनी परत फेर मोजणीचा अर्ज दिला. त्यामुळे निकालाची उत्सुकता अधिकच लागली. यानंतर फायनल मतमोजणीनंतर रोहित पवारांना 1 लाख 27 हजार 688 मते मिळाली तर राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली.
2019 च्या विधानसभेला कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाची निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. कर्जत- जामखेड मतदार संघात शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत रोहित पवार यांनी भाजपचे तत्कालीन मंत्री राम शिंदे यांना पराभवाची धूळ चारली होती. रोहित पवार यांनी पहिल्याच प्रयत्नात राम शिंदे यांना अस्मान दाखवले होते. राम शिंदे यांना 92 हजार 477 मते पडली होती. तर रोहित पवार यांनी 1 लाख 35 हजार 824 मते मिळवत दणदणीत विजय प्राप्त केला होता.
त्याआधी 2014 च्या निवडणुकीत कर्जत जामखेडमध्ये भारतीय जनता पक्षाने गुलाल उधळला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे आणि शिवसेनेचे रमेश भिवराव खाडे यांच्यामध्ये सामना रंगला होता. या निवडणुकीत भाजपचे राम शंकर शिंदे 84,058 मतांनी विजयी झाले होते. तर शिवसेना पक्षाचे रमेश भिवराव खाडे 37,816 मतांनी पराभूत झाले होते.
हे ही वाचा -