Vinayak Raut on Narayan Rane : नारायण राणे (Narayan Rane) म्हणजे थापेबाजी आणि पोपटपंची करणारा माणूस असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली. निवडणुकीत बेसुमार पैशाचा वापर आणि निवडून आल्यानंतर लोकांना लुबाडणे या पलीकडे नारायण राणे यांचे दुसरं कर्तव्य नाही असंही ते म्हणाले. नारायण राणे खासदार असताना त्यांच्या कारकिर्दीत चिपी विमानतळावरील मुंबई सिंधुदुर्ग ही विमानसेवा बंद पडली. मात्र राणेंना त्याचा सांग पत्ता लागलेला नाही असेही राऊत म्हणाले.
नारायण राणेंसारखा कर्तव्य शून्य खासदार पहिल्यांदाच मिळाला
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापनेनंतर नारायण राणेंसारखा कर्तव्य शून्य खासदार पहिल्यांदाच मिळाला, हे सिंधुदुर्गच दुर्दैव असल्याचे विनायक राऊत म्हणाले. नारायण राणे हे पैशांचा बेसुमार वापर करणारा व्यक्ती असल्याचे विनायक राऊत म्हणाले. आम्ही अथक प्रयत्नातून चीपी विमानतळ सुरु केले होते. मात्र, नारायण राणेंच्या काळात ते विमानतळ बंद पडल्याची टीका विनायक राऊत यांनी केली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील प्रचाराला वेग आला आहे. नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र या विधानसभा निवडणुकीत उभे आहेत. आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात चंदक्रात आबाजी जाधव (बहुजन समाज पार्टी), संदेश भास्कर पारकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे निवडणूक लढवत आहेत. तर नारायण राणेंचे दुसरे पुत्र निलेश राणे हे देखील निवडणूक लढवत आहेत. ते कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात रवींद्र हरिश्चंद्र कसालकर (बहुजन समाज पार्टी), विरुद्ध वैभव विजय नाईक (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), अनंतराज नंदकिशोर पाटकर (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी) हे निवडणूक लढवत आहेत. तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दिपक वसंतराव केसरकर (शिवसेना), विरुद्ध राजन कृष्णा तेली (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), विरुद्ध अर्चना संदीप घारे (अपक्ष), विरुद्ध विशाल प्रभाकर परब (अपक्ष) निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, काही दिवसापूर्वीच राणेंचे समर्थक राजन तेली यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता.
महत्वाच्या बातम्या: