Devendra Fadnavis : धर्माचा वापर करून शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेस वोट जिहाद करत आहे, हे खेदजनक असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. सज्जाद नोमानी यांनी 17 मागण्या दिल्या आहेत. या मागण्या खूप भयानक असल्याचे फडणवीस म्हणाले. यामध्ये मुस्लिमांना 10 टक्के आरक्षण द्या, दंग्यातील जे मुस्लिम आरोपी आहेत, त्यांच्यावरील केसेस परत घ्या, आरएसएसवर बंदी घाला अशा मागण्या आहेत. याबाबत उलेमा बोर्डने 17 अटीच्या मागण्या मान्य करू असं सुद्धा सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.


सज्जद नोमानी वोट जिहाद करायला सांगतायत. वोट जिहादचे सिपेहसालार हे शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि नाना पटोले आहे असे सांगतात. निवडणुकीच्या काळात इतकं लांगुलचालन आम्ही यापूर्वी कधी बघितलं नव्हतं. अल्पसंख्यांक मतं मिळवण्यासाठी विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याविरुद्ध सगळ्यांना एक व्हावं लागेल. जे बहुसंख्य मते आहेत, त्यांना पुनर्विचार करावा लागेल एक व्हावं लागेल असे फडणवीस म्हणाले. 


भाजपला मतदान केलं त्यांना शोधून काढा आणि दाणापाणी बंद करा, नोमानीचा  व्हिडीओ


दरम्यान, यापेक्षा भयानक नोमानीचा  दुसरा व्हिडिओ आला, त्यात काही लोकांनी लोकसभेत मुस्लिम समाजाने भाजपला मतदान केलं त्यांना शोधून काढा आणि दाणापाणी बंद करा, सोशल बायकॉट करा असे ते सांगत आहेत. स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे महाविकास आघाडीचे लोक यावर एक शब्द बोलत नाहीत. हे एक्स्ट्रीम पोलरायझेशन ज्या पद्धतीने महाविकास आघाडी करत आहे. त्याला निश्चितपणे उत्तर देऊ असे फडणवीस म्हणाले. 


काँग्रेस जाती-जातीत विभाजित करण्याचा प्रयत्न करतंय 


सोशल बायकॉट करणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात इलेक्शन कमिशनला एक तक्रार केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक राहावं लागेल, एक आहे ते सेफ आहेत असं सांगितलं आहे. आज काँग्रेस जाती-जातीत विभाजित करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने काँग्रेस मुस्लिम समाजाचा एक्स्ट्रीम पोलरायझेशन करुन निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाही ते विकासावर बोलत नाही. त्यांच्याकडे रोडमॅप नाही. फक्त जातिवाद करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचे फडणवीस म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले