Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Dates LIVE : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हाला बंदी नाही, निवडणूक आयोगाची माहिती
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Announcment Live : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
प्रज्वल ढगे Last Updated: 15 Oct 2024 04:30 PM
पार्श्वभूमी
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Announcment LIVE : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र तसेच झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेसह राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त...More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Announcment LIVE : भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र तसेच झारखंडच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. या घोषणेसह राज्यात आता आचारसंहिता लागू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबतची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात किती टप्प्यांत मतदान होणार?महारष्ट्रात 2019 सालाप्रमाणेच यावेळीही एकाच टप्प्यात निवडणूक होणारमहाराष्ट्रात मतदान कधी होणार? भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे.विधानसभा निवडणुकीचा निकाल कधी लागणार? महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागणार आहे. म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. महायुतीला फायदा होणार का?राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधी बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने गेल्या काही दिवसांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये महायुती सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळपास दुप्पट केले आहे. या निर्णयाचा फायदा जवळपास 50 हजार होमगार्ड्सना होणार आहे. त्यामुळे अशा लोकप्रिय घोषणांचा महायुतीला फायदा होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती आमदार? (Maharashtra Vidhansabha MLA List 2019)महायुती : 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)महाआघाडी : 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीत तुतारी चिन्हाला बंदी नाही, निवडणूक आयोगाची माहिती
राजीव कुमार, केंद्रीय निवडणूक आयुक्त
आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मागणी करण्यात आली होती
तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्पष्ट दिसतो तर त्याचा आकार वाढवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती
तर आम्ही ती मागणी मान्य केली आहे
तुतारी वाजवणारा माणूस स्पष्टपणे मोठा दिसेल
पिपाणीला बंदी नाही