Maharashtra Vidhansabha Election 2024: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी तयारी केली जात आहे. गडचिरोली विधानसभा मतदारसंघात (Gadchiroli  Assembly Constituency) देखील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय नेतेमंडळी आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील झाल्याचं पाहायला मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 3 विधानसभा मतदारसंघ आहेत.  यात गडचिरोली,आरमोरी आणि अहेरीच समावेश आहे. आज आपण गडचिरोली विधानसभा मतदारसंघाविषयी जाणून घेऊया.


भाजपकडून गडचिरोली  विधानसभेत उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याने विद्यमान आमदारांच्या गोटात अस्वस्थता पाहायला मिळत होती,. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीला ऊत आल्याचे चित्र बघायला मिळत होत गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या नागपूर दौऱ्यादरम्यान महाराष्ट्रातही ‘गुजरात पॅटर्न’ राबवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या मनात धडकी भरली. यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली विधानसभा मतदारसंघांत भाजप नवा चेहरा देणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. भाजपच्या पहिली यादी समोर आली. मात्र गडचिरोली विधानसभाचे आमदार डॉ.  होळी यांना अजूनही वेटिंगवर ठेवले आहे त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी मिळू शकण्याची शक्यता वाढली आहे.


भाजप आणि काँग्रेस यात दुहेरी लढत


गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यात दुहेरी लढत नेहमी बघायला मिळते आहे. मात्र यंदा काँग्रेसचे अनेक नेते मंडळी भाजपच्या वाटेवर गेले आहे त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी रांग लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये जुने मोठे नेते उरले नाहीत त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं काँग्रेसने ठरवलेलं आहे यात दोन लोकांमध्ये स्पर्धा सुरू आहे.  यात महिला उमेदवार सोनाली कोवे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर माजी खासदार मारोराव कोवासे यांचा मुलगा विश्वजीत कोवासे हे देखील रेसमध्ये आहेत 


गडचिरोली विधानसभा क्षेत्र राजकिय इतिहास 


एकीकडी हा काँग्रेसचा गड होता माजी आमदार डॉ नामदेव असेंडी हे प्रतिस्पर्धी होते. त्यांनी मागील दोन लोकसभा आणि दोन विधानसभा निवडणुकीत सहभागी झाले होते मात्र त्यांना अपयश आले.  मात्र मोदी लाटेमुळे यात परिवर्तन झालं आणि मागील 2 टर्म इथे भाजपचा आमदार निवळून येतो आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मध्ये तिकिटासाठी मोठी घडामोडी बघायला मिळली. डॉ. नामदेव असेंडी हे लेकसभेसाठी इच्छुक होते मात्र त्यांना तिकट न देता नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आल्याने नाराज होऊन ते भाजपच्या वाटेवर निघून गेले.  त्यामुळे काँग्रेस मध्ये मोठे नेते उरले नाही. यंदा  भाजप उमेदवार समोर कोणी मोठा प्रतिस्पर्धी बघायला मिळत नाही आहे मात्र नवीन आणि युवा उमेदवार ला संधी मिळणार आहे त्यामुळे लोकांनाच कौल नेमकं कोणाकडे जाईल हे बघणे महत्वाचे असणार आहे.