मुंबई : माजी आमदार तृप्ती सावंत स्वत:च्या स्वार्थासाठी निवडणूक लढवतायत, त्यांनी मनसेतून निवडणूक लढवण्यासाठी झिशान सिद्दीकीसोबत सौदा केला, असा गंभीर आरोप  मनसेच्याच अखिल चित्रे यांनी तृप्ती सावंत यांनी केला आहे.  माझ्या राजसाहेबांना फसवले जात आहे, असे अखिल चित्रे म्हणाले. 


अखिल चित्रे म्हणाले, मी कोणत्याही मेसेजवर व्यक्त होणार नव्हतो परंतु ज्यांना विषय माहीत नाही, विधानसभेची परिस्थिती माहीत नाही, काय घडलं ते माहीत नाही , ते देखील व्यक्त होत आहेत.  ते माझेच महाराष्ट्र सैनिक सहकारी आहेत म्हणून काय घडलं हे त्यांना सांगणे मी माझी जबाबदारी समजतो म्हणून मी एक खुलासा करत आहे, मला उमेदवारी मिळाली नाही हा विषयचं नाही पण ज्यांना उमेदवारी दिली गेली आहे त्या मनसेतनं जिंकण्यासाठी नाही तर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उभे राहत आहेत.  सोमवार दिनांक 28ऑक्टोबर रोजी वेळ साधारणता रात्री 9.30 -10.30 दरम्यान ठीकाण मकबा हाईट्स येथे मिटींग झाली.  तिथे झिशान सिद्दीकी यांच्याबरोबर सौदा करून फक्त आणि फक्त त्यांच्या सांगण्यावरून निवडणुक मनसेतून लढण्यासाठी त्या तयार झाल्यात.खार पूर्वचे आमच्या येथील बिचारे हिंदू संघनेतील कार्यकर्ते समजत आहेत की य  मॅडम त्या मुस्लमान उमेदवाराला पाडायला उभे आहेत पण त्यांना माहीत नाही त्या तर त्या मुस्लिम आमदाराच्या पैशावरच त्यांच्या सांगण्यावरून उभ्या आहेत.


काय म्हणाले अखिल चित्रे?


आमच्या वांद्रे पूर्व येथील काही भाजपा प्रेरित हिंदू संघटना आम्ही झिशान सिद्दिकीचं या मुस्लिम उमेदवाराचे काम करणार नाही हे सांगण्यासाठी  मॅडमबरोबर सागर बंगल्यावर देखील गेले होते. त्यांना काय माहीत की हा खेळ तर त्यालाच जिंकवण्यासाठी या करत आहेत. 28 तारखेला 11 वाजेपर्यंत झिशान भाईंशी चर्चा होईपर्यंत त्यांना मनसे पक्षाची उमेदवारी नको होती,कारण त्याचं आणि त्यांच्या एकच असलेल्या सहकाऱ्यांचं मत होतं की मनसे पक्षातून जिंकता येणार नाही’ मनसेला वांद्र्यात वोट बँक नाही’. आणखीन खूप काही घडलं.  28 तारखेच्या रात्री माझ्यावर,  माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांचा विश्वास नसेल तर त्याचा देखील खुलासा  योग्य वेळी करेल.  राजसाहेबांना फसवले जात आहे.   प्रयत्न करून पण मी माझ्या साहेबांना सांगण्यासाठी त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी देखील अपयशी झालो. कारण आज सर्व आसपासची लोकं स्वतःला प्रशांत किशोर सारखे ‘ strategist’ समजायला लागले आहेत. त्या मॅडम जिंकल्या तरी मनसे पक्षात राहणार नाहीत आणि हरल्या तरी राहणार नाही, कारण तसं ठरवूनच आणि त्यांच्या Bosses काढून पुनर्वसनाचा वादा घेऊनच त्या मनसेत आल्या, “रात्र भर कभी हां कभी ना”करत मग सकाळी शेवटी आल्या.माझ्या राजसाहेबांना फसवले जात आहे मला माहिती आहे आणि गप्प बसणं याला जर काही कमेंट करणारी लोकं राजनिष्ठा समजत असतील तर माफी असावी मी असा राज निष्ठ नाही.


 ( काहींना प्रश्न पडलेला की मला 2019 ला उमेदवारी दिलेली तर मी काय केलं ? उत्तर : पाच हजार मत होते मी लढण्या अगोदर त्याचे दुप्प पेक्षा जस्त केलेत.) 


हे ही वाचा :


मनसेचा मोठा डाव, नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या रणरागिणीला वांद्रे पूर्वमधून रिंगणात उतरवलं