बाळापूर: शिवसेनेतील फुटीच्या वेळी सुरूवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला ( आसाम ) जाऊन पुन्हा उद्धव ठाकरे यांना साथ देणारे आमदार नितीन देशमुख त्या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात चर्चेत आले होते. ठाकरेंना साथ दिल्यानंतर आमदार देशमुख यांना चौकशीच्या ससेमिरीला तोंड द्यावं लागलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत महायुती आणि वंचितच्या उमेदवारांशी दोन हात करावे लागले. मात्र त्यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे,
बाळापूर :
एकूण मतदार : 311167
झालेले एकूण मतदान : 221042
नोटा : 289
अवैध मते : 03
रद्द केलेली मते : 05
प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते
उमेदवार पक्ष मिळालेली मते
नितीन देशमुख सेना ठाकरे 82088
नातिकोद्दीन खतीब वंचित 70349
बळीराम सिरस्कार सेना शिंदे 61192
ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख 11739 मतांनी विजयी झाले आहेत.
अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघातील चार ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर अकोला पश्चिमची जागा रिक्त आहे. तर, अकोला पूर्व, अकोट, मूर्तिजापूर येथे भाजपचे आमदार आहेत. फक्त बाळापूर येथून शिवसेनेचे ( ठाकरे गट ) आमदार देशमुख हे प्रतिनिधित्त्व करतात. महायुतीतील शिवसेना ( शिंदे गट ), राष्ट्रवादी ( अजितदादा पवार ) आणि भाजपचीही बाळापूर मतदारसंघावर नजर आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अकोला जिल्ह्यात शत-प्रतिशतचा नारा दिला आहे. जिल्ह्यात चार मतदारसंघावर ताबा असलेल्या भाजपनं बाळापूरही आपल्याकडे घेण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे.
शिंदे गटाकडून घेरण्याची रणनीती...
शिवसेना फुटीनंतर नितीन देशमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. मात्र, नंतर गुवाहाटीवरून ते महाराष्ट्रात परते आणि ठाकरेंच्या गोटात सामील झाले. त्यामुळे शिंदे गटाकडून नितीन देशमुख यांना घेरण्याची रणनीती आखण्यात आली होती.
राष्ट्रवादीही आग्रही...
महायुतीतील राष्ट्रवादीनंही ( अजितदादा पवार ) बाळापूर मतदारसंघावर दावा केला होता. 2019 मध्ये तत्कालीन राष्ट्रवादीतील संग्राम गावंडे यांनी निवडणूक लढवत 16 हजार 497 मते घेतली होती. यंदाही राष्ट्रवादीतील तीन ते चार जण बाळापूरमधून लढण्यासाठी आग्रही होते.
2019 मध्ये काय घडलं होतं?
नितीन देशमुख – शिवसेना – 69,434
धैर्यवर्धन पुंडकर – वंचित बहुजन आघाडी – 50,555
रेहमान खान - ‘एमआयएम’ – 44,507
संग्राम गावंडे – राष्ट्रवादी – 16,594
विजयी – नितीन देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीचे पुंडकर यांचा 19 हजार मतांनी पराभव केला होता.