Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या विधानसभा निवडणूका आता जवळ आल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना, काँग्रेस पक्षाकडून आपल्या गटातील बंडखोरीची समजूत काढून अधिकृत उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधकांवर टोलेबाजी करत राजकीय घटनांना वेग आला आहे. दरम्यान, आज बारामतीमध्ये शरद पवार यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत प्रचाराची मुहुर्तमेढ कधी रोवतात याविषयी सांगितलं आहे.राज्यातील निवडणूक बघितली तर जिथं अर्ज भरले आहेत तिथे आज  बसून मार्ग काढू असं सांगत राहूल गांधी, मी आणि शिवसेना एक येऊन प्रचारमोहीम 6 तारखेला सुरु करणार असल्याचं शरद पवार म्हणालेत.


काय म्हणाले शरद पवार?


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, दिवाळी हा मोलाचा क्षण असतो.कुटुंबातील लोकं एकत्र येतात, एकमेकांचे सुख दुःख वाटून घेतात. लोकांचा आत्मविश्वास वाढो, सुख समृद्धी यावी अशी शुभेच्छा. असे पवार म्हणाले.


राज्यातील निवडणूकीत दोन अर्जांवर मार्ग काढू


राज्यातील निवडणूक बघितली तर जिथं दोन अर्ज भरले आहेत तिथे आज आणि बसून मार्ग काढू असं शरद पवार म्हणाले. लोकांनी पाठिंबा द्यावा अशी परिस्थिती निर्माण करतील. राहुल गांधी, मी असेल आणि शिवसेना एकत्र येऊन प्रचाराची मोहीम सहा तारखेला सुरू  होईल. महाराष्ट्रची जनता आम्हाला साथ देईल


बंडखोर नेत्यांची समजूत


राज्यातील विधानसभा निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी आपल्या गटातील बंडखोरांची समजूत काढून अधिकृत उमेदवाराच्या विजयाचा मार्ग निर्धोक करण्यासाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते राबत आहेत. राज्यात मविआची सत्ता आली तर तुम्हाला विधानपरिषदेची आमदारकी देऊ किंवा महामंडळ देतो, अशी आश्वासने मविआच्या नेत्यांकडून बंडखोरांना दिली जात असल्याचे समजते.