महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चार पैकी दोन जागा दिल्या आहेत. तरीही त्या दोन जागांचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. तरी सांगली, अकोल्यापैकी एक जागा स्वाभिमानीला मिळणार असल्याची चर्चा आहे. तर बहुजन विकास आघाडीला पालघरची एक जागा सोडण्यात आली आहे. तर युवा स्वाभिमानीला अमरावतीची एक जागा महाआघाडीतून देण्यात आली आहे.
भाजपकडून साम दाम दंड भेदाचं राजकारण : अशोक चव्हाण
सार्वत्रीक निवडणुकांसांठी या महाआघाडीत आणखीण काही पक्षांनी सामील व्हाव पण भाजपकडून साम दाम दंड भेदाचं राजकारण करण्यात येतं आहे. त्याला काही पक्ष बळी पडत असल्याची टिका अशोक चव्हाण यांनी केली आहे. तसेच भाजप भेदाचं राजकारण करतं मतांमध्ये फूट पाडायचा प्रयत्नसुद्दा केला जात आहे. भाजप-शिवसेना यांसारख्या धर्मांद पक्षांना जनता या वेळी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. भाजप-शिवसेनेने गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप केलेली नाही. खोटी आश्वासनं, खोट्या घोषणा देऊन जनतेचा विश्वास घात केला आहे. तर देशातील राजकीय व्यवस्थेला उद्धवस्त करण्याचं काम यांनी केलं असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.
VIDEO | अखेर राज्यातल्या महाआघाडीचं चित्र अखेर स्पष्ट | मुंबई | एबीपी माझा
देशाचे पंतप्रधान गुपचूप पाकिस्तनाचा पंतप्रधान शुभेच्छा : जयंत पाटील
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुपचूप पाकिस्तनाच्यी पंतप्रधानांना शुभेच्छा देतात अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. नरेंद्र मोदींची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे. तसेच महाआघाडीत स्वाभिमानी संघटना आमच्याबरोबर आली आहे. आता आम्ही आणखीन ताकदीने निवडणूक लढवू असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जे महाघाडीत आले नाही ते भाजपचे बी टीम : अजित पवार
महाआघाडीच्या चर्चा करताना अनेकदा काहींनी टोकची भूमिका घेतली. काही न काही कारण सांगून महाआघाडी होऊ नये म्हणून भूमिका घेतली. त्यांना भाजप आणि शिवसेनेला फायदा करून घ्यायचा होता. पण सगळ्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन आम्ही एकत्र आलो आहेत. पण जे महाघाडीत आले नाही ते भाजपचे बी टीम असल्याची राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. भाजपत सगळं चांगलं होत तर बाहेरून लोक का घेतली? तोडफोडाचं राजकारण का केलं? असा सवाल अजित पवार केला आहे.
मुंबईत संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आघाडीसोबत असलेल्या पक्षांची माहिती दिली. त्यानंतर, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील युती सरकारवर टीका केली. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह महाआघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थित होते.
राज्यातील महाआघाडी चित्र कसं असेल?
काँग्रेस 24
राष्ट्रवादी 20
स्वाभिमानी शेतकरी 2
बहुजन विकास आघाडी 1
युवा स्वाभिमानी 1
VIDEO | माझं पक्षात कुणीही ऐकत नाही, अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत? | एबीपी माझा