भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना भाजप विधानसभेचे तिकीट (MP BJP Candidate List)  देणार की नाही या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली असून त्यामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्या निकटवर्तीय मंत्र्यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होणार असल्याचे निश्चित झाले आहे.


निवडणूक आचारसंहिता लागू होताच भारतीय जनता पक्षानेही आपली बहुप्रतिक्षित चौथी यादी जाहीर केली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आणि खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं गेलं आहे.  स्थितीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान निवडणूक लढवणार नाहीत, त्यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून सर्व विधानसभा जागांवर जबाबदारी देण्यात येणार आहे अशी चर्चा होती. पण या चर्चा चुकीच्या ठरल्या. 


मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना बुधनी येथून तिकीट मिळाले आहे. याशिवाय त्यांच्या जवळच्या मंत्र्यांनाही मैदानात उतरवले आहे. शिवराज सरकारमधील बहुतांश मंत्र्यांचा चौथ्या यादीत समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या जवळच्या नेत्यांचाही या यादीत समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने चौथ्या यादीत आपली बहुतांश पत्ते उघड केली आहेत. आता कदाचित आणखी एक किंवा दोन याद्या शक्य आहेत.


या मंत्र्यांना तिकीट मिळालं


शिवराज सरकारमधील अनेक मंत्र्यांना तिकीट देऊन मैदानात उतरवले आहे. यामध्ये डॉ. प्रभुराम चौधरी, गोपाल भार्गव, कमल पटेल, भूपेंद्र सिंह, गोविंद सिंह राजपूत, मोहन यादव, तुलसीराम सिलावत, राजेंद्र शुक्ला, नरोत्तम मिश्रा, प्रद्युमन सिंह तोमर, ब्रिजेंद्र प्रताप सिंह, विश्वास सारंग यांच्यासह अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.


मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोरम आणि तेलंगणा (Assembly Election 2023 Dates)  या  पाच राज्यांच्या विधानसभा  निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 


कोणत्या राज्यात कधी मतदान? (Five state voting & counting dates)


मिझोरम - 7 नोव्हेंबर रोजी मतदान (Mizoram voting date)
छत्तीसगड - 7  आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Chhattisgarh voting date)
मध्यप्रदेश - 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Madhya Pradesh voting date)
राजस्थान - 23 नोव्हेंबर रोजी  मतदान (Rajasthan voting date)
तेलंगाणा -  30 नोव्हेंबर रोजी मतदान
पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी


ही बातमी वाचा: