Madha Lok Sabha Exit poll : माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघात कोण जिंकून येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. कोण जिंकणार हे 4 जूनला समजणार असले तरी निकालापूर्वीच तीन दिवस आधीच TV 9 चा एक्झीट पोल हाती आला आहे. यानुसार माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite patil) विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपचे रणजितसिंह निंबाळकर (RanjeetSingh Nimbalkar) यांना पराभवाचा धक्का बसणार असल्याचं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं आहे. निंबाळकरांचा पराभवचा हा भाजपसाठी मोठा धक्का ठरु शकतो.  


महायुती आणि मविआमध्ये जोरदार टक्कर


एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये दिसली रस्सीखेच
महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज
महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज


महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?


भाजप 17 जागा
शिंदे गटाला 6 जागा 
अजित पवार गट  1 जागा


महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?


शिवसेना ठाकरे गट 9 जागा
काँग्रेस 8 जागा
शरद पवार गटाला 6 जागा 


महाराष्ट्रात महायुतीसह भाजपला मोठा तोटा शक्य
2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 च जागा शक्य
शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरणार


TV9 एक्झिट पोलचा अंदाज काय?


दरम्यान,  TV9 एक्झिट पोलनुसार भाजप 19 जागांवर विजयी होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 
तर अजित पवार गटाला 0 तर ठाकरे गटाला 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसला 5 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज TV9 एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे. 


आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला आहे. तर महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, खरे चित्र येत्या 4 जून दिवशीच स्पष्ट होणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Lok Sabha Poll of Exit Poll : एबीपी, चाणक्य, माय अॅक्सिस ते पोलस्टार, सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी!


Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.