Madha Loksabha Election : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Loksabha Election) राजकीय घडामोडींना वेग आलाय. अकलूजच्या शिवरत्नवर (Shivaratna) बैठकांचं सत्र सुरु आहे. भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjit Singh Nimbalkar) तिकीट दिल्यानंतर, आता धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) नेमका काय निर्णय घेणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol kolhe) हे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी आले आहेत. त्यांनी मोहिते पाटील यांची भेट घेत कुटुंबियांशी संवाद साधला आहे. दरम्यान, कोल्हेंच्या भेटीनंतर धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शरद पवार गटाकडून लढवणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. 


धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता


दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्या दृष्टीनं हालचालींना वेग आलाय. रणजितसिंह निंबाळकरांनी तिकीट जाहीर झाल्यापासून धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज आहेत. ते मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या कोट्यातील एक जागा महादेव जानकरांनी देणार असल्याची चर्चा सुरु होती, पण महाेव जानकरांनी महुयातीत जामं पसंत केलं आहे. त्यामुळं आता पवार गटाकडून कोण निवडणूक लढवणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच आता विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शिवरत्न या निवासस्थानी हालचालींना वेग आलाय. त्याठिकाळी बैठकांचे सत्र सुरु झालं आहे. अशातच डॉ. अमोल कोल्हे विजयसिंह मोहिते पाटील यांना भेटून गेल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. 


राजकारणात बऱ्याच घडामोडी सुरु, लवकरच दुसरी यादी जाहीर होणार


दरम्यान, या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विचारणा केली. यावेळी कोल्हे म्हणाले की, एका विवाह सोहळ्यासाठी मी आलो होतो. आल्यानंतर विजयदादांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांच्या घरी आलो असल्याचे अमोल कोल्हे यावेळी म्हणाले. सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी सध्या सुरु आहेत. त्या झाल्या की उेदवारांची दुसरी यादी देखील जाहीर होईल, असे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Madha : मोहिते पाटलांची माढ्यातून माघार? सध्यातरी'वेट अँड वॉच'ची भूमिका, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसही कात्रीत