Madha Lok Sabha Result 2024 : माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघ यावेळी संपूर्ण राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहेत पाटील हे मोठ्या मतांनी विजयी झाले आहेत. मोहिते पाटील यांनी 1 लाख 20 हजाराहून अधिक मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव केला आहे. 

  


माढा लोकसभा मतदारसंघात अनेक दिग्गज नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. भाजपकडून पुन्हा रणजितसिंह निंबाळकर (RanjeetSingh Nimbalkar) हे निवडणुकीच्या रिंगणात होते, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite patil) हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात अखेर मोहिते पाटील यांनी बाजी मारलीय. 


माढा लोकसभा निकाल 2024 (Madha Lok Sabha Election Result 2024) 


उमेदवाराचे नाव  -                      पक्ष                                        -विजयी उमेदवार


रणजितसिंह निंबाळकर -           भाजप                                     
धैर्यशील मोहिते पाटील -        राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट          धैर्यशील मोहिते पाटील


माढा लोकसभा मतदारसंघात 60 टक्के मतदान (Madha Lok Sabha Voting Percentage 2024) 


माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. या ठिकाणचे मतदार हे राजकीयदृष्ट्या अधिक सजग असल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील चांगले मतदान केलं. माढा लोकसभेत 11 लाख 92 हजार 190 म्हणजे जवळपास 60 टक्के मतदान झालं आहे. यात सर्वात जास्त मतदान हे फलटण येथे 64 टक्के तर सर्वात कमी मतदान करमाळा येथे 55 टक्के झालं आहे. माढा तालुका 61 टक्के, माळशिरस 60 टक्के, माण 58 टक्के मतदान झाले. मतदानाच्या वेळी सर्वात तणावपूर्ण स्थिती सांगोला तालुक्यात होती. सांगोला तालुक्यात देखील 60 टक्के मतदान होताना हाणामारी आणि बाचाबाचीच्या घटना समोर आल्या होत्या. यात बागलवाडी येथे एका तरुणानं थेट ईव्हीएम मशीन जाळण्याचाही प्रयत्न केला. मात्र, सुदैवानं मशीनला कोणताही धोका न पोचल्यानं पुनर्मतदान घेण्याची वेळ आली नाही. करमाळा शहरामध्ये दिवसभर शांततेत मतदान झालं असताना संध्याकाळी एका तरुणानं खिशात आणलेल्या हातोडीनं ईव्हीएम मशीन फोडण्याचाही प्रयत्न केला. 


कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?


माढा - बबनदादा शिंदे - राष्ट्रादी काँग्रेस अजित पवार गट
करमाळा - संजयमामा शिंदे - राष्ट्रादी काँग्रेस अजित पवार गट
सांगोला - शहाजीबापू पाटील - शिवसेना शिंदे गट
माळशिरस - राम सातपुते - भाजप
माण खटाव - जयकुमार गोरे - भाजप
फलटण - दिपक चव्हाण - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट


2019 सालचा निवडणूक निकाल - (Madha Lok Sabha Constituency 2019 Result)


2019 साली माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांनीच निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवी होती. यामध्ये रणजितसिंह निंबाळकर यांचा 85764 मतांनी विजयी झाला होता.


मराठा कार्ड यावेळी फायदेशीर ठरल्याची चर्चा (Maratha Card)


माढा लोकसभा मतदारसंघात देखील मराठा कार्ड प्रभावी ठरल्याची चर्चा आहे. कारण मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा तरुणांनी भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले होते. याचा फायदा धैर्यशील मोहिते पाटील यांनी होण्याची शक्यात आहे. तर मराठा मतांचा फटका रणजितसिंह निंबाळकरांना बसण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. 


माढ्याच्या लढतीकडं राज्याचं लक्ष


माढा लोकसभा मतदारसंघाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी सभा घेतल्या आहेत. तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेतल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीपुर्वी मोहिते पाटील कुटुंबाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळच्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकरांना एक लाख मतांचं मताधिक्य दिलं होतं. यावेळी मात्र, मोहिते पाटील हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र, त्यांना भाजपनं तिकीट दिले नाही. पुन्हा निंबाळकरांनांच तिकीट दिले. त्यामुळं नाराज असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. 


महत्वाच्या बातम्या:


Madha loksabha Exit poll : माढ्यात तुतारीचा आवाज घुमणार, कमळाला हादरा बसणार, काय सांगतो एक्झिट पोल?