बारामतीसाठी भाजपचा जोर
भाजपने बारामती जिंकण्याच्या वल्गना केल्या होत्या. सुप्रिया सुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत नक्की हरणार. त्या किती मतांच्या फरकाने हरतील हेच पाहायचं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पवारांचा गड जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटील बारामतीमध्ये तळ ठोकून होते. शिवाय भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत, सगळ्यांनी कांचन कुल यांच्या प्रचारात कंबर कसली होती. त्यामुळे सुळे यांच्यासाठीचा मार्ग कठीण झाल्याचं चित्र निर्माण करण्यास भाजप यशस्वीही झाली होती.
शरद पवाराचं विशेष लक्ष
भाजपने या मतदारसंघात जोर लावल्याने शरद पवार आणि अजित पवार यांनीही इथे विशेष लक्ष घातले होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी पवारांनी जोरदार प्रयत्न केले होते. अखेर इथल्या विजयानंतर सुप्रिया सुळे यांनी "श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!", या ओळी ट्विटर आणि फेसबुकवर शेअर केल्या आहे.
सुप्रिया सुळेंना कडवी लढत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ हा सर्वात सुरक्षित आणि लाखोंच्या मताधिक्याने विजय मिळवून देणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र, भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ सलग तिसऱ्यांदा राखला. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी सुप्रिया सुळेंना कडवी लढत दिली. मात्र सुप्रिया सुळे यांनी सुमारे दीड लाखांनी विजय मिळवला. 2014 मध्ये सुळे यांचा सुमारे 69 हजार मतांनी रडतखडत विजय झाला होता. रासपच्या महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेंना चांगलंच झुंजवलं होतं.
संबंधित बातम्या