Loksabha Election Result 2024 News : लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election) कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी महायुतीचे उमेदवारही आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 
दरम्यान, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या माढा (Madha), सोलापूर (Solapur) आणि धाराशीव (Daharashiv) लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडतयं? तर या तिन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहे. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर धाराशीवमध्ये ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आघाडीवर आहेत.

Continues below advertisement


कोणत्या उमेदवाराला किती माताधिक्य?


माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे 8500 मतांनी आघाडीवर आहेत. तर चौथी फेरी अखेर ओमराजे निंबाळकर हे 53 हजार 917 मतांनी आघाडीवर आहेत. तर सोलापूरमधून  काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या 21000 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळं ही आघाडी महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते आणि अर्चना पाटील यांची डोकेदुखी वाढवणारी आहे. कारण हे तिन्ही उमेदवार सध्या पिछाडीवर आहेत. मात्र, हे सुरुवातीचे कल आहेत. अद्याप पूर्ण मतमोजणी झालेली नाही. त्यामुळं पुढच्या फेऱ्यांमध्ये नेमकं काय होणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Lok Sabha Election Result 2024: राहुल शेवाळे, मिहीर कोटेचा पिछाडीवर; उज्वल निकम याचं काय? मुंबईतून कोण कोण आघाडीवर?