मुंबई : भाजपनं आपलं लक्ष लोकसभा निवडणुकांकडे वळवलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली.  आणि आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 'मिशन 45'ची घोषणा त्यांनी केली. त्यासाठी त्यांनी 10 शिलेदार निवडले आहेत. महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या 18 मतदारसंघावर भाजपने करडी नजर ठेवली आहे. नेमकं हे मिशन 45 आहे काय? कोणते खासदार रडारवर आहेत? 


2019 च्या लोकसभेचं गणित काय होतं? 


महाराष्ट्रात 48 जागांवर लोकसभेची निवडणूक होते.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2019 ला 48 पैकी 23 जागा भाजपनं जिंकल्या  तर 18 जागांवर शिवसेनेनं विजय मिळवला.  4 जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. मात्र आगामी निवडणुकीत भाजपनं 45 जागांवर जिंकण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे.त्यामध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपची विशेष नजर असणार आहे.  



 शिवसेनेच्या 18 मतदारसंघावर  भाजपचे विशेष लक्ष? 


बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केलं आहे. बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघात  भाजप आपली ताकद लावणार आहे.  यामध्ये 18 मतदारसंघात भाजप विशेष लक्ष देणार आहे.  ते शिवसेनेचे मतदारसंघ आहेत  



 बुलडाणा- प्रतापराव जाधव, 


हिंगोली- हेमंत पाटील, 


पालघर- राजेंद्र गावित,


 कल्याण- श्रीकांत शिंदे,


 दक्षिण मध्य मुंबई- राहुल शेवाळे, 


दक्षिण मुंबई- अरविंद सावंत, 


शिर्डी- सदाशिव लोखंडे, 


रत्नागिरी-सिंधुदुर्ग- विनायक राऊत,


 कोल्हापूर- संजय मंडलिक, 


हातकणंगले- धैर्यशील माने. 



लोकसभा मिशन 45 साठीचे भाजपचे शिलेदार कोण?  
 
भाजपने १२ प्रमुख नेत्यांची या मिशनसाठी निवड केली आहे.  प्रत्येक नेत्याकडे दोन लोकसभा मतदारसंघ असं हे गणित आहे. आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे प्रमुख नेते आहेत.  


   
दक्षिण मध्य मुंबई - प्रसाद लाड


 दक्षिण मुंबई - संजय उपाध्याय


कल्याण - संजय केळकर 


 पालघर - नरेंद्र पवार
 
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - आशिष शेलार 
    
हिंगोली - राणा जगजीतसिंग


बुलडाणा - अनिल बोंडे
 
शिर्डी - राहुल आहेर,  


कोल्हापूर - सुरेश हळवणकर, 


हातकणंगले - गोपीचंद पडळकर  


भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. मोदींची प्रत्येक योजना ही सामान्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आता इतर पक्ष आपलं गणित कसं लावतात आणि हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर सध्या प्रत्येक निवडणूक ही शिवसेना - भाजपच्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे भाजपच्या रणनीतीनंतर शिवसेना काय करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.