पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून अपक्ष उमेदवारी केल्याने पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. भाजप कोट्यातून भाऊसाहेब वाकचौरे साईबाबा संस्थानचे विश्वस्त आहे. मात्र पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याने विश्वस्त पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे.
VIDEO | अहमदनगर मतदारसंघातील लोकप्रतिनीधींच्या कामगिरीचा लोखाजोखा | भाग 12 | वारी लोकसभेची
शिर्डी लोकसभा मतदारसंघात रामदास आठवले यांचा पराभव करुन शिवसेनेकडून भाऊसाहेब वाकचौरे 2009 मध्ये खासदार झाले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2014 च्या पराभवानंतर वाकचौरे यांनी भाजपात प्रवेश करत साई संस्थानवर विश्वस्तपद मिळवलं होतं.
भाजपच्या भाऊसाहेब वाकचौरेंची बंडखोरी, शिर्डीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार