बीड : बीडमध्ये भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी सोमवारी (25 मार्च) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. बीडमध्ये प्रीतम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यासह रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेकडून कालिदास आपेट हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


संपत्तीच्या विवरणानुसार, प्रीतम मुंडे यांची जंगम मालमत्ता 10 कोटींपेक्षा जास्त, तर स्थावर मालमत्ता तीन कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय त्यांच्यावर 8 कोटी 62 लाख रुपयांचं कर्ज आहे. बजरंग सोनवणे यांची जंगम मालमत्ता अडीच कोटी तर स्थावर मालमत्ता दीड कोटींपेक्षा अधिक आहे. तसंच त्यांच्यावर 64 लाखांचं कर्ज आहे.

VIDEO | खासदार प्रीतम मुंडे यांचं गाजलेलं भाषण | बीड | माईक टेस्टिंग | एबीपी माझा



उमेदवारांच्या संपत्तीचं विवरण

बँकेत रोख : प्रीतम मुंडे : 45,61,929

हातातील रोख रक्कम : प्रीतम मुंडे : 3,70,125

मुदत ठेवी : 5,28,152

शेअर्स : 1,72,72,569

सोने : 100 ग्रॅम, किंमत 3,20,000
चांदी : 5 किलो, किंमत 1, 92, 500
दागिने : 8, 00, 000

जंगम मालमत्ता : 10,47,70,949
स्थावर मालमत्ता : 3,87,48,654

कर्ज : 8,62,77,794

गौरव खाडे यांची एकूण संपत्ती..

हातातील रोख रक्कम : 5,95,939

बँकेत रोख : 5,95,939

जंगम मालमत्ता : 2,21,02, 323
स्थावर मालमत्ता : 18,56,000

कर्ज : 1,25,56,000
वाहन : ऑडी कार, किंमत 22,00,000

---------

बजरंग सोनवणे यांची संपत्ती
जंगम मालमत्ता : 2,52,11,409
स्थावर मालमत्ता : 1,63,00,000
कर्ज : 64,23,301

सारिका सोनवणे यांची संपत्ती
जंगम मालमत्ता : 1,12,36,000
स्थावर मालमत्ता : 58,50,000
कर्ज : 14,39,801
वाहन : 1 स्कॉर्पिओ, तीन ट्रॅक्टर किंमत 3,75,000, 1 टँकर  15,34,996

आंबेडकर, शिंदे, स्वामी; सोलापुरातील उमेदवारांची मालमत्ता किती?

VIDEO | ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं गाजलेलं भाषण | बीड | माईक टेस्टिंग | एबीपी माझा