गडचिरोली : गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील चार केंद्रांवरील मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे. कोणत्या केंद्रावर मतदान होऊ शकलं नाही आणि ते कधी करणार हे लवकरच सांगण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज संपन्न झालं. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी आज झालं. पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी सातपासून सुरु झालेलं मतदान संध्याकाळी सात वाजता संपलं. यंदा मतदानाची वेळ दीड तासांनी वाढवली होती.

Loksabha Election 2019 : पहिल्या टप्प्यातलं मतदान संपलं, विदर्भातील मतदानाचा सखोल आढावा

मात्र नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीच मतदानापूर्वीच नक्षलवाद्यांचा हैदोस पाहायला मिळाला. नक्षलवाद्यांनी काल भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. आज मतदानाच्या दिवशीही पोलिसांसोबत चकमक, सी60 कमांडो पथकावर हल्ला अशा त्यांच्या कुरापती सुरुच होत्या. कालच्या स्फोटानंतर सुरु असलेले ऑपरेशन आणि सततच्या गोळीबारामुळे निवडणूक अधिकारी संबंधित चार केंद्रांवर वेळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे इथलं मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे.

VIDEO | मतदान संपताच नक्षलवाद्यांचा जवानांवर हल्ला, तीन कमांडो जखमी | गडचिरोली | एबीपी माझा



संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.78 टक्के मतदान
राज्यातल्या सात मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.78 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. वर्ध्यात 55.36 टक्के मतदान झालं, रामटेक इथे 51.72 टक्के, नागपूर इथे 53 टक्के, भंडारा गोंदिया इथे 60.50 टक्के, गडचिरोली-चिमूरमध्ये 61 .33 टक्के, चंद्रपूर 55.97 टक्के, तर यवतमाळ-वाशिम येथे 53.97 टक्के मतदान झालं. भर उन्हातही मतदार उत्साहाने घराबाहेर पडले आणि मतदानाचा हक्क बजवला. तर नक्षलवाद्यांच्या हैदोसानंतरही गडचिरोलीत सर्वाधिक मतदान झाल्याचं पाहायलं मिळतं.

संबंधित बातम्या :

विदर्भातील मतदारसंघनिहाय आढावा

Lok Sabha Election LIVE UPDATE | विदर्भातील सात जागांसह देशभरात 91 मतदारसंघांमध्ये मतदान




राज्यात 3 लाखांहून अधिक दिव्यांग मतदार, दिव्यांग मतदारांसाठी विशेष सुविधा

माओवाद्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या इशाऱ्यानंतर गडचिरोली-चिमुर मतदार संघात अतिरिक्त पोलीस बल तैनात

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे, त्या सात जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?

'या' कारणामुळे मतदानाची वेळ दीड तासाने वाढवली

पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावणार, विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये मतदान