भोपाळ : भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांनी बाबरी मशिदीबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याने साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.


साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी आणि भोपाळचे जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांना दिलं होतं. मात्र यावर खाडे यांच समाधान झालं नाही. त्यानंतर प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात टीटी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आचारसंहितेचं उल्लघन केल्याप्रकरणी प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच यावर 24 तासात उत्तर मागवलं होतं.


काय बोलल्या होत्या प्रज्ञासिंह ठाकूर?


प्रज्ञा सिंह ठाकूर एका टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रमात त्या बोलल्या की, "मी बाबरी मशीद पाडायला गेले होते, आम्ही मिळून मशिदीचा ढाचा पाडला आणि आता मंदिर बांधायलादेखील जाणार आहे. मी पूर्ण आत्मविश्वासाने बोलत आहे, कारण प्रभू श्रीराम माझे आदर्श आहेत. त्यांच्यावर माझी भक्ती आहे. राम राष्ट्र आहे, राष्ट्रही राम आहे, त्यामुळे भव्य राम मंदिर बनवण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही."


शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य


साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबतही वादग्रस्त केलं होतं. "हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला." याप्रकरणी साध्वींना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. जनतेच्या संतापानंतर साध्वींना याबद्दल माफीही मागावी लागली होती.


VIDEO | साध्वीचं वक्तव्य हा शहीदांचा अपमान नाही का? | माझा विशेष



संबंधित बातम्या


आम्ही बाबरी मशीदीचा ढाचा पाडला आता मंदिर बांधायला जाणार : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर


शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंहला निवडणूक आयोगाची नोटीस


हेमंत करकरेंबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर साध्वी प्रज्ञा सिंहने मागितली माफी


साध्वी प्रज्ञाच्या विरोधातील याचिकेवर 23 एप्रिलपर्यंत उत्तर द्या, एनआयए कोर्टाचे तपास यंत्रणा आणि साध्वी प्रज्ञा सिंहला निर्देश