सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा नोटाबंदी, बेरोजगारी, आरक्षण अशा विविध मुद्द्यांवरुन भाजप सरकार आणि नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपकडे साडेचार वर्षात काही विकासकामं केली नाहीत, त्यामुळे आज ते जातीचं राजकारण करुन तुमची माथी भटकवत आहेत, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.

महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांमध्ये जर स्थानिक लोकांनाच फक्त प्राधान्य दिलं, तर आरक्षणाची गरजच लागणार नाही. आज ग्रामीण महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार बसला आहे आणि आपण सगळे जातीच्या चर्चांमध्ये अडकलो आहोत. मुळात सरकारी नोकऱ्या राहिल्यात किती? जातीवरुन मतं मिळवण्यासाठी आरक्षणाची आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, सत्तेत आल्यानंतर दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ. मात्र नोकऱ्या दिल्या नाहीतच उलट नोटबंदीमुळे चार ते पाच कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. नोटबंदीमुळे फक्त सोलापुरात 40 हजार यंत्रमाग कामगारांच्या नोकऱ्या गेल्या असल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली.

 

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • निवडणूक जिंकल्यानंतर सत्ताधारी तुमच्याशी खोटं बोलतात, कारण निवडणूक हा विषय आपण गांभीर्याने घेत नाही - राज ठाकरे
  • गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या - राज ठाकरे
  • आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा ,तुम्ही किती खोटं बोललात ह्याचा हिशोब आधी करा. राज ठाकरेंना भाजपल टोला
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 वर्षांपूर्वी जी दाखवलेली स्वप्न आहेत त्याविषयी बोलत नाहीत - राज ठाकरे
  • पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांच्या जीवावर मतं मागत आहेत, ऐअरस्ट्राइकच्या जीवावर का मतं मागत आहेत - राज ठाकरे
  • मोदी म्हणाले होते की दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ, मात्र नोकऱ्या दिल्याच नाहीत - राज ठाकरे
  • उलट नोटाबंदीमुळे देशात साडेचार ते पाच कोटी रोजगार गेले- राज ठाकरे
  • महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये जर स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच नाही - राज ठाकरे
  • तरुण बेरोजगार आहेत आणि आपण जातीच्या चर्चांमध्ये अडकलोय - राज ठाकरे
  • जातीवरून मतं मिळवण्यासाठी आरक्षणाची आमिषं दाखवत आहेत- राज ठाकरे
  • 5 वर्ष झाली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं? - राज ठाकरे
  • बहुमत मिळूनही मोदी सरकार जनतेशी खोटं बोलतंय- राज ठाकरे
  • विकासाच्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी जातीचा मुद्दा बाहेर काढला जातो- राज ठाकरे
  • सरकारने 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचा दावा खोटा- राज ठाकरे
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद जवानांच्या नावाने मतं मागत आहे- राज ठाकरे
  • पंतप्रधानांच्या मते देशाच्या जवानापेक्षा व्यापारी साहसी आहेत- राज ठाकरे
  • नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना आठ-दहा लोकांच्या हाती देशाती सत्ता द्यायची आहे- राज ठाकरे
  • हिटलरने जर्मनीत जे केलं, पंतप्रधानांना ते भारतात करायचं आहे- राज ठाकरे
  • नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना लोकशाही मोडीत काढायची आहे- राज ठाकरे
  • भाजपने देश लुटून खाल्ला आहे- राज ठाकरे
  • भाजपने पैसे वाटले तर घ्या, मात्र त्यांच्याकडे परत ढुकूंनही पाहू नका- राज ठाकरे
  • ज्यांच्यावर विश्वास दाखवला त्यांनी केसांनी गळा कापला- राज ठाकरे
  • उद्योगपतींच कर्ज माफ होतात, मात्र शेतकऱ्यांचे नाही- राज ठाकरे
  • मोदी, शाह पुन्हा सत्तेवर येणार नाहीत याची काळजी घ्या- राज ठाकरे