मुंबई : मतदानाचा टक्का वाढवा यासाठी मतदार जनजागृतीवर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र मतदार यादीतून नाव गायब होणं, व्होटिंग स्लिप घरी न पोचणं, पत्ता बदलणं यासारख्या तांत्रिक कारणांमुळे अनेक मतदारांना मतदानाला मुकावं लागतं. निवडणूक कर्मचाऱ्यांसोबत प्रत्येक गल्लीत पोलिंग बुथ एजन्ट्स घरोघरी पायपीट करून मतदारांची पडताळणी करत असतात.


मतदानाला अवघे काही तास उरलेले असतांना अनेक मतदारांना नेमक्या काय समस्या भेडसावत आहेत, याची माहिती पोलिंग बुथ एजन्ट्सनी दिली. अनेक मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत आलेली आहेत. तर जे मतदार हयात आहेत, त्यांच्या नावासमोर डिलीटचा स्टॅम्प आल्याने ते मतदानासाठी अपात्र ठरत आहेत. याशिवाय मतदारांची नावे दुसऱ्याचा वॉर्डात आल्याचाही घोळ समोर आला आहे.



याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली असल्याचं पोलिंग एजन्ट्सनी सांगितलं. मात्र याबाबत कोणतेही पाऊल निवडणूक आयोगाने उचललं नाही. त्यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.