जालना : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी जालन्यात काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. केवळ भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना पाडण्यासाठी आपण काँग्रेसला याठिकाणी पाठिंबा दिल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.


मी काँग्रेसच्या बाजूने कधीच नव्हतो आणि असणारही नाही. मात्र रावसाहेब दानवेंना पाडण्यासाठी काँग्रेसला मतदान करणार आहे. तसेच काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे, आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. जालन्यात पत्रकारांशी बोलतांनी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


रावसाहेब दानवेंना आम्ही याठिकाणी जिंकू देणार नाही.जर शेतकऱ्यांना शिव्या देणारे दानवे येथे निवडून आले, तर आमची इज्जत पुन्हा खाली गेल्या शिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही काँग्रेसला पाठिंबा जाहीर करत असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं.


बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर आपण दानवे यांच्या विरोधात प्रचार करुन त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ असं जाहीर केलं. दरम्यान आज बच्चू कडू यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देत भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समोर आव्हान उभं केलं आहे.


VIDEO | दानवे माझी मेहबूबा, मी त्यांच्यावर प्रेम करतो, ते माझ्यावर इश्क करतात : अर्जुन खोतकर