औरंगाबाद : काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचं बंड शमलं आहे.अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र अब्दुल सत्तार आपला अर्ज मागे घेतला आहे.


सुभाष झांबड यांना औरंगाबाद मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिल्याने अब्दुल सत्तार नाराज होते. मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढली तरी जिंकण्याची शक्यता फार कमी होती. याशिवाय सेक्युलर मतांचं विभाजन होऊ नये, यासाठी अब्दुल सत्तार यांनी अर्ज मागे घेतला आहे.


अब्दुल सत्तार आता कोणाच्या पाठीमागे उभे राहणार, काँग्रेसला मदत करणार की नाही? यासंदर्भात येत्या सात दिवसात निर्णय घेणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.


गेल्या काही दिवसांत काँग्रेसवर नाराज अब्दुल सत्तार यांनी दोनदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सत्तार यांनी आपल्या मुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार करण्याची अट मुख्यमंत्र्यांकडे घातली. मात्र या जागेसाठी आधीच कुणालातरी आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अशी माहिती समोर आली होती.


VIDEO | अब्दुल सत्तार यांचं बंड शमलं, निवडणुकीतून माघार : सूत्र | औरंगाबाद | एबीपी माझा



सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उभे राहिल्यास भाजपने पाठिंबा द्यावा अशी अट अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यासमोर ठेवली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याची माहिती सूत्रांमार्फत समोर आली होती. त्यामुळे सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत आणि लोकसभा निवडणुकीत भरलेला अपक्ष अर्जही ते मागे घेतील, अशी माहिती 'माझा'ने आधीच दिली होती. एकंदर विधानसभेसाठी अब्दुल सत्तार यांचं सेटिंग सुरु होतं, यातून दिसून येत आहे.


संबंधित बातम्या


अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे एकाच विमानाने मुंबईत, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण


अब्दुल सत्तार यांची बंडखोरी अशोक चव्हाणांच्या गुप्त सूचनेनुसार?


औरंगाबाद काँग्रेसमध्ये खुर्च्यांवरुन राजकारण, राजीनाम्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यालयातील खुर्च्या सोबत नेल्या


औरंगाबाद लोकसभेच्या तिकीटावरुन काँग्रेसमध्ये जुंपली, आमदार अब्दुल सत्तारांनी बंड पुकारलं, अपक्ष लढणार