Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election Result 2024: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे 1 लाख 34 हजार 650 मताधिक्याने विजयी झाले. औरंगाबाद पश्चिम, गंगापूर आणि वैजापूर हे विधानसभा मतदारसंघ भुमरे यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मराठवाड्यात महायुतीला ही एकमेव जागा जिंकता आली.


एमआयएमचे उमेदवार माजी खासदार इम्तियाज जलील हे 3 लाख 41 हजार 480 मते घेत दुसऱ्या, तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे 2 लाख 93 हजार 450 मते घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले. लोकसभेच्या या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. पराभव होईल असे कधीच वाटत नव्हते. मुख्यमंत्री इथे मुक्कामी होते, त्यांनी काय घोळ केला माहिती नाही. संदीपान भुमरे यांनी 80 कोटी रुपये वाटले, काही लोक पैशांच्या मागे पडले. मी व्यसनमुक्ती आहे. प्रचंड सेवा केली, एकनिष्ठ राहिलो, असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.


मी कधीच पहिल्या फेरीत मागे नव्हतो- चंद्रकांत खैरे


मी कधीच पहिल्या फेरीत मागे नव्हतो, पण यंदा मागे राहिलो.  आमचे दोन जिल्हाप्रमुख आहे, एक आजरी आहे, दुसरे अंबादास दानवे होते. त्यांनी काम केले पाहिजे होते, निवडून आणण्याची त्यांची जबाबदारी होती. सर्व काही मीच करायला पाहिजे होते का?,त्यांनी आपला मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी फिरायला नको होते, असं खळबळजनक वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं. उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व काही सांगणार आहे, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले.


आता मी पक्षाचं काम करणार- चंद्रकांत खैरे


पुढील विधानसभा निवडणुक जिंकायची आहे. आता मी पक्षच काम करणार आहे. 106 जागा विधानसभेत आणायचे आहे. शिवसेना नेते पद आहे, मरेपर्यंत राहते. सक्रिय राजकारणात मी असणार आहे, असंही चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले.


निकालाची ठळक वैशिष्ट्ये


1 -छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात.


2 -या चार मतदारसंघात संदिपान भुमरे यांना सर्वाधिक मतं मिळाली तर इम्तियाज जलील यांना औरंगाबाद मध्य आणि औरंगाबाद पूर्व या मतदारसंघात आघाडी मिळाली आहे.


3-संदिपान भुमरे यांना सर्वाधिक आघाडी गंगापूर या मतदारसंघातून मिळाली.


4-सहाही मतदारसंघात चंद्रकांत खैरे यांच्यापेक्षा संदिपान भुमरे यांना अधिकची लीड.


5-वंचित आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची जाधव यावेळी चालली नाही..


लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?


देशपातळीवरील समीकरणं


एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17


महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल


महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1


महायुतीमधील पक्षीय बलाबल


भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1


महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?


काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8