लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांत 5 वाजेपर्यंत 54.85 टक्के मतदान 

Lok Sabha Election Phase 1 Voting: लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान आहे. देशात 102 तर राज्यात 5 मतदारसंघात आज मतदान होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Apr 2024 06:01 PM
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघांत 5 वाजेपर्यंत 54.85 टक्के मतदान 

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज सकाळी 7 पासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 54.85 टक्के मतदान झाले आहे.


पहिल्या टप्प्यातील एकूण 5 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे


रामटेक  52.38 टक्के
नागपूर 47.91 टक्के
भंडारा- गोंदिया 56.87 टक्के
गडचिरोली- चिमूर 64.95 टक्के
आणि चंद्रपूर 55.11 टक्के आहे.

Chhagan Bhujbal Press Conference : छगन भुजबळ लवकरच पत्रकार परिषद घेणार, नेमकं काय सांगणार?

मंत्री छगन भुजबळ आज एक पत्रकार परिषद घेणार आहेत. शध्या महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून वाद चालू आहे. हा तिढा अजूनही सुटलेला नाही. नाशिकमधून राष्ट्रवादीतर्फे भुजबळ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता भुजबळ पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते नेमकं काय सांगणार? असे विचारले जात आहे. 

Sharad Pawar On Amit Shah : दहा वर्षांपासून सत्ता भाजपकडे आणि हिशोब मला मागतायत, शरद पवारांची अमित शाहांवर टीका

अमित शाह नावाचे एक गृहस्थ आहेत. ते तडीपार होते. त्यांनी एक भाषण केलं. दहा वर्षांत शरद पवार यांनी काय केलं याचा हिशोब द्या असं ते म्हणाले होते.2014 ते 2024 या काळात राज्य मोदींचं होतं. अमित शाहा मंत्री होते. सत्तेत ते होते पण मला हिशोब मागतात. सत्ता त्यांच्याकडे आहे, याची आठवण त्यांना नाही. ते सत्ता मुठभरांसाठी वापरत आहेत.

लोकशाहीत निर्णय घेण्याचा अधिकार लोकांकडे, तो कायम राहिला पाहिजे- शरद पवार

लोकशाहीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा लोकांचा आहे. हा अधिकार कायम राहिला पाहिजे. मात्र आज देशात काहीतरी वेगळं घडतंय, अशी शंका लोकांना येत आहे. हे जर खरं असेल तर लोकांच्या या अधिकारावर संकट येईल. ते होऊ द्यायचं नाही. भाजपच्या मंत्र्यांनी एक भाषण केलं. या देशातील घटना मोदी साहेबांना बदलायची आहे. ती बदलायची असेल तर जास्तीत जास्त खासदार निवडून द्या, असं हा मंत्री म्हणाला. असं असेल तर प्रश्न गंभीर झाला आहे, असं शरद पवार म्हणाले.

Ajit Pawar NCP Manifesto : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीरनामा 22 तारखेला प्रसिद्ध होणार, नेमकी आश्वासनं काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा सोमवारी 22 तारखेला प्रसिद्ध होणार


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा गुरुवारी 25 तारखेला प्रसिद्ध होणार


शरद पवारांच्या पक्षाचा जाहीरनामा काँग्रेसचा जाहीरनाम्याशी मिळताजुळता 


शेतकऱ्यांच्या एमएसपीचा मुद्दा, महागाई, बेरोजगारीसह हाऊसिंगशी संबंधित मुद्द्यांचा समावेश  


अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा भाजपच्या जाहीरनाम्याशी मिळता जुळता

अडीच ते तीन लाख मतांच्या फरकाने विजयी होणार- नारायण राणे

मला भारतीय जनता पार्टीने सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाने उमेदवारी दिली आहे. त्यासाठी मी मोदी, अमित शाहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली. त्यांचा मी ऋणी आहे. मी आज माझा उमेदवारी अर्ज भरायला चाललो आहे. मी अडीच ते तीन लाख मताधिक्याने जिंकू शकतो. नारायण राणे आणि शक्तिप्रदर्शन हे समीकरण आहे. त्यामुळे आम्ही कोणाला दाखवण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत नाही. आम्हाला अजित पवार, एकनाथ शिंदे यांचीही ताकद मिळालेली आहे. 

सर्वांनी मतदान करावं, माझाच विजय होणार याचा मला विश्वास- नितीन गडकरी

सर्वांनी मतदान करावं. मतदान कोणाला करावं हा लोकांचा अधिकार आहे. पण प्रत्येकाने मतदान करायला हवं. मतदानाचा टक्का वाढायला हवा, यासाठी आम्ही प्रयत्नक केला आहे. या निवडणुकीत माझाच विजय होणार, याचा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली. 

Rohit Pawar on Supriya Sule Campaign : सोडून गेलेल्यांनी निष्ठा राखली नाही, त्यामुळे हनुमानाचा आशीर्वाद सुप्रिया सुळे यांनाच मिळणार- रोहित पवार


कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारावर प्रतिक्रिया दिली. प्रथेप्रमाणे कन्हेरी या गावातील हनुमानाच्या मंदिरात नारळ फुटत असतो. नारळ फुटल्यानंतर आमच्या प्रचारला सुरुवात होत असते. याच कारणामुळे आम्ही येथे आलो आहोत. ही परंपरा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. शरद पवार यांना येण्यासाठी अजून वेळ आहे. पण लोक येथे जमा होत आहेत. हनुमान निष्ठा आणि शक्तीचे प्रतिक आहे. लोक शरद पवार यांना सोडून गेले. त्यांनी निष्ठाच राखली नाही. त्यामुळे हनुमान सुप्रिया सुळे यांनाच आशीर्वाद देणार. 

Mohan Bhagwat Voting : सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ते भाऊजी दफ्तरी शाळेत मतदानासाठी पोहोचले होते.

Devendra Fadnavis Comment On Voting : मतदानानंतर देवेंद्र फडणीस यांची पहिली प्रतिक्रिया

सध्या लोकशाहीचा उत्सव चालू आहे. मी, माझी पत्नी तसेच माझ्या आईने मतदान केले आहे. जनतेनेही या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं. लोकांनी मतदान करावं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Devendra Fadnavis Comment On Voting : मतदानानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

सध्या लोकशाहीचा उत्सव चालू आहे. मी, माझी पत्नी तसेच माझ्या आईने मतदान केले आहे. जनतेनेही या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं. लोकांनी मतदान करावं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Devendra Fanavis Voting: देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. ते सपत्निक मतदानासाठी आले होते. धरमपेठ येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या आईदेखील उपस्थित होत्या. 

Ramtek Election:  रामटेकचे लढाई ही महिला सन्मानाची :श्यामकुमार बर्वे

Ramtek Election:  रामटेकमधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. कांद्री इथे मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. रामटेकचे लढाई ही महिला सन्मानाची असल्याचं श्यामकुमार बर्वे मतदानानंतर म्हणाले.

Vijay Wadettiwar:  लोकशाही वाचवण्यासाठी मतदान केलं पाहिजे: विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar:  विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मतदान केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी मतदानानंतर दिली

Nitin Gadkari: नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क बजावला

Nitin Gadkari:  नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे.  तर नागपूरमधील मविआचे उमेदवार विकास ठाकरे यांनीही मतदान केलं  आहे. 

Nagpur- Bhandara Election: नागपुरात मतदानाला जोर, पहिल्या दोन तासात 13 टक्के मतदान

Nagpur- Bhandara Election: नागपूर आणि भंडाऱ्यात मतदानाल प्रतिसाद मिळत आहे.  नागपूर लोकसभा मतदारसंघात पहिल्या दोन तासात सुमारे 13 टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. तर भंडाऱ्यात 7.22 टक्के मतदान झाले आहे. 

Gadchiroli Election:  गडचिरोलीतील मविआ उमेदवार नामदेव किरसान यांनी बजावला मतदानाचा हक्क

Gadchiroli Election:  गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नामदेव किरसान यांनी मतदानाचा हक्क बजावला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथल्या रीसामा इथल्या केंद्रावर त्यांनी मतदान केलं. लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर मतदान करा, असं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं.

PM Modi On Voting:  सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करा, पंतप्रधान मोदींचे मतदारांना आवाहन

PM Modi On Voting:  आज मतदान होतंय त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ट्वीट करुन मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान
करण्याचं  आवाहन केले आहे. पंतप्रधान म्हणाले,  तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मी आवाहन करतो.शेवटी, प्रत्येक मत मोजलं जाते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो.


 





Election News: राजू पारवे, प्रशांत पडोळे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Election News:  चंद्रपूरच्या मविआच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी सकाळी लवकर जाऊन मतदान केलं. तर दुसरीकडे, रामटेक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी देखील मतदान केलं. भंडाऱ्यातील मविआचे उमेदवार प्रशांत पडोळे यांनी मतदानाचा हक्क बजावला

Mohan Bhagwat: सरसंघचालक मोहन भागवत यांनी बचावला मतदानाचा हक्क

Mohan Bhagwat: पूर्व विदर्भात मतदान सुरू होताच संरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केलं. नागपूरच्या भाऊजी दप्तरी शाळेतील मतदान केंद्रावर भागवत यांनी आपला हक्क बजावला. तर चंद्रपूरच्या मविआच्या उमेदवार प्रतिभा धानोकर यांनीही सकाळी लवकर जाऊन मतदान केलं. तर दुसरीकडे, रामटेक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी देखील मतदान केलं. 

Chandrapur Election: चंद्रपूर -आर्णी लोकसभा मतदारसंघात 18 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार

Chandrapur Election: चंद्रपूर -आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली. या मतदारसंघात राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा हे चंद्रपूर जिल्ह्यातील तर वणी आणि आर्णी हे दोन मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यातील आहे.  मतदारसंघात एकूण 2 हजार 118 मतदान केंद्र असून 18 लाख 37 हजार 906 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. 

Nitin Gadkari:  नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवारांसाठी प्रतिष्ठेची लढत

Nitin Gadkari:  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. नागपूर  मतदारसंघांकडे अवघ्या देशाचं लक्ष  लागले आहे. 

Gondia Election : गोंदियात मतदानाला सुरुवात

Gondia Election : गोंदियात मतदानाला सुरुवात झाली आहे.  केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे..

Bhandara Lok Sabha:  भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु

Bhandara Lok Sabha:  भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झालं आहे. भंडारा शहरातील जिजामाता महाविद्यालय आणि उच्च महाविद्यालयात या मतदान सुरु झालं आहे. इथे पहिल्यांदा मतदान करण्याचा मान ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाना मिळाला. त्यांनी युवांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

पार्श्वभूमी

Lok Sabha Election Phase 1 Voting: लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू होतंय़. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मतदान होतंय, एकूण १०२ मतदारसंघात आज मतदार आपला मतदानाचं परम कर्तव्य बजावतील. राज्याचा विचार केला तर आज पूर्व विदर्भात पाच मतदारसंघात मतदान होतंय. नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया या पाच मतदारसंघात मतदान होणार आहे. या पाचही ठिकाणी महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी थेट लढत होतेय. यंदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रिंगणात आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.