मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024 Result) निकालाचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजील संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या 400 पार जागांचा दावा तीन एक्झिट पोल खरा ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहेत. चाणक्य, सीएनएक्स आणि न्यूज नेशन या दोन एक्झिट पोलमध्ये भाजपचा 400 पारचा नारा खरा ठरताना दिसत आहे, पण या 400 जागा एकट्या भाजपला नाही, तर एनडीएला मिळू शकतात. एक्झिट पोल काय सांगतो, वाचा.


टुडेज चाणक्य एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार, भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 400 पार जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. चाणक्य एक्झिट पोलनुसार, भाजपला 335 जागांवर विजय मिळून शकतो, तर एनडीएला 400 जागा मिळू शकतात. याशिवाय काँग्रेसला 50 जागांवर समाधान मानावं लागेल. इंडिया आघाडीला 107 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. इतर पक्षांना 36 जागा मिळू शकतात.


न्यूज नेशनच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 342-378 जागा मिळण्याची शक्यता आहे. न्यूज नेशनच्या एक्झिट पोलनुसार, इंडिया अलायन्सला 153-169 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 21-23 जागा मिळण्याची शक्यता आहे.


इंडिया टीव्ही-सीएनएक्सच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला सर्वाधिक 401 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. हा एक्झिट पोल भाजपच्या 400 पार जागांच्या घोषणेच्या जवळ जात आहे. यामध्ये एनडीएला 371 ते 401 जागा, इंडिया आघाडीला 109 ते 131 तर इतर पक्षांना 28 ते 38 जागा मिळण्याची शक्यता आहे.


रिपब्लिक इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला 353-368 जागा मिळण्याची शक्यता आहे. रिपब्लिक भारतच्या एक्झिट पोलनुसार, काँग्रेस आघाडीला 118-133 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर इतरांना 43-48 जागा मिळण्याची शक्यता आहे. दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला 281-350 जागा मिळतील, तर इंडिया अलायन्सला 145-201 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.


भाजप स्वबळावर 400 पार गाठू शकत नाही


कोणत्याही एक्झिट पोलमध्ये भाजपला स्वबळावर 400 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. भाजपने यावेळी ‘400 पार’ असा नारा दिला होता. एक्झिट पोलमध्ये भाजप या घोषणेपासून खूप दूर असल्याचे दिसत आहे. पण, काही एक्झिट पोलमध्ये एनडीए 400 पार घोषणेच्या जवळपास असल्याचं दिसत आहे.


Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष, दुसऱ्या नंबरवर ठाकरे गट; एक्झिट पोल काय सांगतो, पाहा