Lok Sabha Election 2024 Phase 2 Polling Live: नांदेडमध्ये मतदाराने मतदान मशिन फोडलं, कर्मचाऱ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न

Lok Sabha Election 2024 Phase 2 : राज्यात  आज विदर्भातले बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातले हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होणार आहे

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Apr 2024 04:43 PM

पार्श्वभूमी

Lok Sabha Election 2024 Phase 2 Voting Live:  आज देशभरात दुसऱ्या टप्प्य़ाचं मतदान होणार आहे. देशात ८८ तर राज्यात ८ मतदारसंघात मतदान होणार आहे. एकूण १२ राज्यात आज मतदार आपला...More

Nanded Lok Sabha Election : नांदेडमध्ये मतदाराने मतदान मशिन फोडलं, कर्मचाऱ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एक गंभीर प्रकार घडला आहे. भानुदास एडके या व्यक्तीने मतदान केंद्रात प्रवेश करत चक्क VVPAT मशीन आणि बलेट मशीन कुऱ्हाडीने तोडून टाकली. या व्यक्तीने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचे ओरडत होता. मतदान केंद्रावर गृह रक्षक दलाचे कर्मचारी तैनात होते पण त्यांचाही नाईलाज झाला. या फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे 500 मतदान झाले होते. पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्याने झालेले मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनाचा दावा आहे.