Lok Sabha Election 2024 Date : देशात तब्बल 2 लाख मतदार हे 100 वर्ष वयाचे असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुका कधी होणार यासंदर्भातील माहिती देण्यासाठी निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद सुरु आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांनी माहिती दिली. मतदान प्रक्रियेत चार आव्हानं आमच्यासमोर आहेत. यामध्ये गुंडगिरी रोखण्यासाठी सीएपीएफ तैनात करण्यात येणार आहे. 


यावेळी मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांनी दिली. तसेच मतदान केंद्रावर शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे राजेश कुमार म्हणाले.  निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही. तर फुकट वापरल्या जाणाऱ्या गोष्टीवर नियंत्रणासाठी यंत्रणा सतर्क करण्यात आल्याची माहिती राजेश कुमार यांनी दिली. 


या निवडणुकीत बळ पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही. काही राज्यात बळाचा तर काही राज्यात पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. यावर या निवडणुकीत पूर्ण नियंत्रण केल जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजेश कुमार यांनी दिली आहे. 


देशात  एकूण 97 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. देशात साडेदहा लाखांपेक्षा जास्त मतदान केंद्र, 55 लाखांपेक्षा अधिक EVM,  1.2 कोटी  प्रथम मतदार, 48 हजार तृतीयपंथी, 100 वर्षापेक्षा जास्त मतदारांची संख्या 2 लाख ,  1.5 कोटी निवडणूक अधिकारी, 18 ते 21 वयोगटातील मतदारांची संख्या 21.50 कोटी, 12 राज्यात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं आहे.