मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि  विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अहमदनगरच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मन वळवण्यासाठी राहुल गांधींनी प्रयत्न करावेत यासाठी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. पहायकमांडकडे गाऱ्हाणं मांडूनही अहमदनगरची जागा मुलगासाठी न मिळाल्याने विखे पाटील नाराज होते. त्यामुळे ते विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

सुजय विखेंपाठोपाठ रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला?

सुजय विखे पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मंगळवारी (12 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना-भाजप सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नसल्याने, विरोधी पक्षनेतेपदावरुन पायउतार होत असल्याचं विखे पाटील यांनी राजीनाम्यात म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.

VIDOE | राधाकृष्ण विखे-पाटील यांचा नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा? | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा



विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी अनेकदा युती सरकारसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला होता. परंतु अहमदनगरची जागा न मिळाल्याने नाराज असलेले त्यांचे पुत्र सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे स्वत:चाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने, विरोधी पक्षनेता म्हणून सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला नाही, या भावनेतून त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे.

माझ्या घरातल्या मुलांचा हट्ट मी पुरवेन, दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, त्यांना काय वाटेल? : शरद पवार



काँग्रेसलाही सोडचिठ्ठी?

राज्यातील विरोधी पक्षनेत्याचा मुलगाच भाजपमध्ये दाखल झाल्यामुळे काँग्रेसची राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर नाचक्की झाली आहे. काँग्रेसने साथ न दिल्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील अस्वस्थ आहेत. पुत्रप्रेमापोटी सुजयला साथ द्यायची तर काँग्रेससाठी अडचणीचं होईल आणि काँग्रेससोबत राहिलं तर मुलाला साथ दिली नाही, असा संदेश जाईल, अशा कात्रीत राधाकृष्ण विखे-पाटील सापडले आहेत. त्यामुळे ते काँग्रेसलाही सोडचिठ्ठी देण्याचा विचार करत असल्याचं समजतं.

संबंधित बातम्या

काँग्रेसला धक्का, सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश

अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागेल, विखे पाटलांचा गर्भित इशारा