Kolhapur North Bypoll LIVE : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत दुपारी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.27 टक्के मतदान

Kolhapur North By Election 2022 : भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केलेल्या उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. भाजपच्या सत्यजित कदम आणि काँग्रेसच्या जयश्री जाधव यांच्यात लढत

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Apr 2022 05:39 PM

पार्श्वभूमी

Kolhapur Election 2022 : कोल्हापूर (Kolhapur) उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण 2 हजार 142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, एकूण 357 केंद्रांवर...More

Kolhapur : संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.27 टक्के मतदान

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक मतदान टक्केवारी


संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 55.27 % मतदान


एकूण 1 लाख 61 हजार 289 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क


84 हजार 566 पुरुष तर, 76 हजार 721  महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क