Kolhapur Municipal Corporation Election: राज्यामध्ये एकमेव महायुती झालेल्या कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे. दुपारी साडेतीन पर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 50.85% मतदान पार पडलं आहे. दुपारी साडे तीनच्या आकडेवारीनुसार कोल्हापूरचा आकडा हा सर्वाधिक आहे. कोल्हापूरच्या मतदानामध्ये लाडक्या बहिणीच्या तुलनेत लाडक्या भावांचे मतदान सर्वाधिक झाल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. दुपारी साडेतीन पर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण मतदानापैकी 52.28 टक्के पुरुष मतदारांनी मतदान केलं आहे, तर 49.44 टक्के महिलांनी मतदान केला आहे, तर इतर 27 टक्क्यांनी मतदान केलं आहे. 

Continues below advertisement

कोल्हापूरमध्ये अत्यंत चुरशीने मतदान

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 4,94,711 मतदानापैकी 2 लाख 51 हजार 548 जणांनी मतदानाचा अधिकार पूर्ण केला आहे. त्यामुळे मतदानाची वेळ संपेपर्यंत मतदानाचा आकडा गेल्यावेळेच्या तुलनेमध्ये वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे इचलकरंजी महापालिकेसाठी दुपारी साडेतीन पर्यंत 46.23% मतदान झालं आहे. कोल्हापूरमध्ये अत्यंत चुरशीने मतदान होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वाधिक 63.43 टक्के मतदान झालं आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 9 मध्ये 58.01 टक्के मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक 1 सतेज पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. प्रभाग क्रमांक 9 मध्ये शारंगधर देशमुख विरुद्ध राहुल माने अशी कोल्हापूर महापालिकेची सर्वात हाय व्होल्टेज लढत होत आहे. प्रभाग क्रमांक सातमधून कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर विरुद्ध अपक्ष विजय साळोखे सरदार यांची सर्वाधिक लक्षवेधी लढत होत आहे. या प्रभागामध्ये दुपारी साडेतीन पर्यंत 51.51 टक्के मतदान पार पडला आहे. सर्वात कमी मतदान प्रभाग क्रमांक 13 मध्ये झालं असून त्याठिकाणी 42.19 टक्के मतदान झालं आहे. 

साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

  • बृहन्मुंबई महानगरपालिका : ४१.०८ टक्के
  • पुणे : 39 टक्के
  • ठाणे -41 टक्केवारी
  • पिंपरी चिंचवड - 40.05 टक्के 
  • कोल्हापूर - 50.85 टक्के
  • इचलकरंजी :  46.3टक्के 
  • नागपूर   :  ३७.१९ टक्के
  • सोलापूर : ४०. ३९ टक्के
  • अकोला  :  43.35 टक्के
  • धुळे : 36.49 टक्के
  • परभणी : 49.16%  
  • इचलकरंजी : ४६.२३ टक्के 
  • जालना : 45.94 टक्के 
  • नांदेड : 41.65 टक्के
  • अहिल्यानगर  : 48.49 टक्के
  • भिवंडी निजामपूर -  ३८.२१ टक्के
  • उल्हासनगर - 31 टक्के
  • मालेगाव - 46.18 टक्के
  • सांगली मिरज कुपवाड -    41.79 टक्के
  • नवी मुंबई - 45.48%
  • ठाणे महानगरपालिका - 41 टक्के
  • पनवेल -44 टक्के

इतर महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement