सांगली : खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होत असून शिंदेच्या शिवसेनेचे सुहास बाबर यांच्यासमोर शरद पवार गटाकडून वैभव पाटील आणि अपक्ष राजेंद्र देशमुखांचं आव्हान आहे. या आधी 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचे अनिल बाबर हे या ठिकाणाहून आमदार झाले होते. त्यामुळे यंदा बाबर गटाला हॅट्रिकची संधी आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही यंदा खानापूरमध्ये विजय मिळवण्यासाठी चांगली तयारी केली आहे.
खानापूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटात बंडखोरी झाली असून आटपाडीचे राजेंद्र देशमुख यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राजेंद्र देशमुख हे या निवडणुकीत किंग मेकर ठरणार की सुहास बाबर, वैभव पाटील यापैकी कुणाच्या विजयात अडथळा ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
जिल्ह्यातील हा एकमेव मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर शिंदे गटाने या ठिकाणी सुहास बाबर यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा मोठा प्रभाव आहे.
2019 च्या निवडणुकीत काय झालं होतं?
- अनिल बाबर (शिवसेना) - 1,16,974
- सदाशिवराव हनमंतराव पाटील (अपक्ष) - 90,683
ही बातमी वाचा: